
दाभाडी येथे शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रे वाटप करतांना तज्ञ मार्गदर्शक.
जळगाव निंबायती (वार्ताहर) मालेगांव तालुका पाच दिवसीय शिक्षक क्षमता वृद्धी २.० प्रशिक्षणाचा चौथा टप्पा दाभाडी येथे संपन्न झाला. समारोप प्रसंगी सुलभक (तज्ञ मार्गदर्शक) यांना डॉ. हेमंत मगर, मुख्याध्यापक प्रशांत पवार व प्रा. अमोल अहिरे यांनी शाल, शैक्षणिक साहित्य, विवेकानंदांची प्रतिमा व पुस्तक भेट देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी प्रशिक्षणास उपस्थित शिक्षकांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

प्रशिक्षणास नाशिक जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले, शासनाच्या विविध योजना, उपक्रम व परिपत्रकांची माहिती दिली. तसेच गटशिक्षणाधिकारी तानाजी घोंगडे यांनी देखील मार्गदर्शन केले. समारोप प्रसंगी पर्यवेक्षिका सरोज देवरे, प्रशांत पवार, सचिन देशमुख आदींची भाषणे झालीत. सूत्रसंचलन संजय मगर यांनी केले, तर आभार प्रशांत पाटील यांनी मानलेत. शिक्षकांना त्यांच्या अध्यापनात विविध कौशल्याचा वापर करुन, नवीन शिक्षण पद्धती आणि तंत्रज्ञानाचा अधिकाधिक अवलंब करणे तसेच विद्यार्थ्यांना अधिक प्रभावीपणे अध्ययनासाठी सक्षम करणे, या उद्देशाने सदर प्रशिक्षण घेण्यात आले. या तालुका स्तरीय पाच दिवसीय प्रशिक्षणास १० फेब्रुवारी पासून सुरुवात झाली असून १७ मार्च पर्यंतच्या कालावधीत पाच टप्प्यात हे प्रशिक्षण होणार आहे. चौथ्या टप्प्यापर्यंत तालुक्यातील १७०० शिक्षकांनी प्रशिक्षण घेतले आहे. उर्वरित ४०० शिक्षकांचे प्रशिक्षण पुढील आठवड्यात होणार आहे. दाभाडी येथील जयहिंद इंग्लिश स्कुल, जि.प. प्राथमिक मराठी मुलांची शाळा, जि. प. प्राथमिक मराठी कन्या शाळा या ठिकाणी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. यासाठी १८ सुलभक (तज्ञ शिक्षकांची) मार्गदर्शक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

तज्ञ मार्गदर्शन म्हणून विजय पगार, प्रशांत ठाकरे, दिनेश शेलार, बाळासाहेब देवरे, सिमा जाधव, चेतन देशमुख, नीलिमा देसले, विशाल रणवीर, किरण केदार, रवींद्र राऊत, सुहास शेवाळे, राकेश बेडसे, संदीप महिरे, भूषण पाटील, खालिद अन्सारी, उमेश पवार, दत्तात्रेय भामरे, प्रशांत कुलकणों, चंद्रकांत शेलकर, मिलिंद बोडके आदी कार्य पार पाडत आहेत. प्रशिक्षणासाठी विस्ताराधिकारी साहेबराव निकम, नजीर पटेल, विशाल धांडे, संयोजक रमेश चव्हाण, मुख्याध्यापक शरद निकम, अजय जाधव, रहीम कुरेशी, तसेच सर्व केंद्रप्रमुख यांची प्रशिक्षण सनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.आकडेवारी१० फेब्रुवारी ते १७ मार्च प्रशिक्षण कालावधीइयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतच्या शिक्षकांसाठीप्रशिक्षणासाठी दाभाडी येथे तीन केंद्रतज्ञ शिक्षक प्रशिक्षिक १८ प्राथमिक शिक्षक प्रशिक्षणार्थी ११३६माध्यमिक शिक्षक प्रशिक्षणार्थी १०२४
