
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८८७ वा दिवस
मन जेव्हा एकाग्र होते व अंतर्मुख होऊन जेव्हा ते स्वतःवरच केंद्रित होते तेव्हा आपल्यातील सर्व शक्ती जागृत होऊन आपल्या अंकित होतात आणि आपल्या दास होतात. आपण इंद्रियाचे दास राहत नाही. इंद्रिये, मन आणि इच्छाशक्ती यांना नियंत्रित करणे म्हणजेच योग. आपण इंद्रियांनी नियंत्रित होण्याऐवजी इंद्रियांचे नियंत्रण करण्यास शिकतो हा योग शास्त्राच्या अभ्यासाचा सर्वात महत्वाचा लाभ आहे. मनाचे अनेक स्तर आहेत. हेच सर्व स्तर ओलांडून जाऊन ईश्वरप्राप्ती करून घेणे हे आपले खरे अंतिम ध्येय आहे. या अंतिम लक्षापर्यंत पोहचल्याशिवाय थांबता कामा नये.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर ५ वैशाख शके १९४७
★ चैत्र वद्य/कृष्ण १२
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शुक्रवार दि. २५ एप्रिल २०२५
★ १८५९ सुएझ कालव्याची पायाभरणी
★ १९८२ रंगीत दूरचित्रवाणी प्रेक्षपणाची सुरुवात
★ २००५ भारतीय तत्त्वज्ञ, रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष शंकरन कुट्टी ऊर्फ स्वामी रंगनाथन यांचा स्मृतीदिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
