
*सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८८६ वा दिवस* आपले हे शरीर एक रथ असून आत्मा त्या रथात बसलेला रथस्वामी आहे. बुद्धी ही त्या रथाची सारथी आहे. मन लगाम आहे आणि इंद्रिये त्या रथाला जुंपलेले घोडे आहेत. नीट वळण दिले गेल्यामुळे ज्याचे घोडे काबूत आहेत, त्यांचा लगाम पक्का असून बुद्धी सारथ्याने तो नीट सावरून धरलेला आहे, तोच त्या सर्वव्यापक परम पदास (अंतिम गंतव्यापर्यंत) पोहोचतो. याउलट ज्याच्या रथाचे इंद्रियरुपी घोडे कह्यात नाहीत आणि मनरुपी लगाम नीट सावरलेला नाही, त्याचा रथ अखेर विनाशाप्रत जातो. मोह, माया व भौतिक सुखाचा त्याग करुन, इंदियांवर नियंत्रण मिळविणे महा कठीण काम आहे. निरपेक्षपणे सतत साधना केल्यानंतर ते शक्य होते. स्वामी विवेकानंद… *●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●**
★ भारतीय सौर ४ वैशाख शके १९४७*
★ चैत्र वद्य/कृष्ण ११
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ गुरुवार दि. २४ एप्रिल २०२५
★ वरुथिनी एकादशी 🚩🚩🚩🚩🚩
★ वल्लभाचार्य जयंती
★ १९२८ लोकनेते व्यंकटराव हिरे यांचा जन्मदिन
★ १९९४ किर्लोस्कर उद्योग समूहाचे आधारस्तंभ पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर यांचा स्मृतीदिन.★ जलसंपत्ती दिन.
★ पंचायत राज दिन.
★ श्वान दिन


