
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावर पूर्व भागात असलेल्या जातेगाव येथील ग्रामपालिकेच्या हद्दीत असलेल्या गावठाणातील जागेवर अनेक अतिक्रमणे झाले असून सदरचे झालेले अतिक्रमण काढण्यात यावे तसेच शासकीय घरकुलामध्ये गैरवापर झालेला असून त्याची सकून चौकशी करुन कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी दिनांक 4 मार्च 2025 रोजी मंगळवार पासून सुरू करण्यात आले आहे. मात्र दोन वाजेपर्यंत कोणताही अधिकारी व संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी उपोषण स्थळी फिरकले नाही.
याबाबत सविस्तर माहिती अशी की नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील श्री कडूबा कचरू महाले यांनी दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी नांदगाव पंचायत समिती यांना दिलेल्या अर्जामध्ये म्हटले आहे की, जातेगाव ग्रामपालिकेच्या मालकीच्या गावठाणातील जागेवर गावातील बऱ्याच लोकांनी बेकायदेशीरपणे घराचे तसेच दुकानाचे बांधकाम करून ग्रामपंचायत जागेवर अतिक्रमण केले आहे. याबाबत वारंवार तक्रार देऊन देखील सदर जागेवरील अतिक्रमणे आज पर्यंत काढण्यात (हटविण्यात) आलेली नाही. तसेच गावातील बऱ्याच गरीब लोकांचे घरकुलांचे प्रकरण मंजूर झाले असून सदरचे लोकांना घरकुल बांधण्यासाठी अतिक्रमणामुळे जागा उपलब्ध होत नाही. व बऱ्याच लोकांनी शासकीय घरकुलाचा लाभ घेऊन सदरचे शासकीय घरकुल हे भाडेतत्त्वावर दिलेले आहेत.तर घरकुलाचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी सदरचे घरकुल टाकळी आहेत याची चौकशी करण्यात यावी. असे गटविकास अधिकारी पंचायत समिती नांदगाव यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. परंतु गिधाडाच्या कातड्याच्या प्रशासनाने व अधिकाऱ्यांनी सदरच्या अर्जाची कुठलीही दखल न घेतल्याने शेवटी दिनांक 4 मार्च 2025 रोजी सोमवारी सुरू केली आहे.
जातेगाव ग्रामपंचायत अधिकारी गोपाल चौधरी यांनी उपोषण स्थळी भेट दिली परंतु उपोषण करते कडूबा महाले यांना त्यांनी अतिक्रमणाबाबत व घरकुलाबाबत झालेल्या गैर्यवराबाबत उडवा उडवीची उत्तरे.देत होते.
जातेगाव ग्राम पालिकेच्या हद्दीतील घरकुलाबाबत झालेल्या गैरव्यवराबाबत लाभार्थ्यांना प्रत्यक्षात न बोलवता व प्रत्यक्ष त्या घरकुलामध्ये कोण राहतं याची चौकशी न करता पंचनामा न करता वेळ काढू पणा करत आहेत. यामुळे उपोषण करते कडूबा महाले यांनी जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाही. खात्रीशीर लेखी उत्तर मिळत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही असा ठाम निर्धार करुन उपोषण सुरू ठेवण्याचा ठाम निर्णय घेतला आहे.
