
सिन्नर (प्रतिनिधी)आदिवासी भूषण डाँ. गोविंद गारे यांच्या ८६ व्या जयंती निमीत्त महामिञ परिवार , आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड अ. भा. आदिवासी विकास परिषद व सह्याद्री आदिवासी कोळी महादेव जमात संघटना यांच्या वतीने सिन्नर येथे त्यांना अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरूवात आदिवासी भूषण डाँ.गोविंद गारे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामिञ दत्ता वायचळे म्हणाले की.डाँ.गोविंद गारे साहेब हे आदिवासी विचारवंत,साहित्यिक,इतिहास संशोधक होते.
त्यांनी आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांची मुळ प्रतिमा संशोधन करून तयार केली.डाँ.गोविंद गारे यांचा जन्म ४ मार्च १९३९ ला जुन्नर तालुक्यातील निमगिरी या गावी एका आदिवासी महादेव कोळी कुटूंबात झाला.काँलेज मध्ये असताना त्यांनी आपल्या संशोधन व्रुत्तीमुळे आदिवासींची खरी परिस्थिती,संस्क्रुती मांडण्यासाठी “विशाल सह्याद्री” या वर्तमान पञातुन लेखमाला “मावळची मुशाफिरी” लिहीण्यास सुरवात केली व त्या लेखमालेला खुप प्रसिध्दी मिळाली.पुढे त्यांना आदिवासी समाजाच्या अभ्यासासाठी ब्रिटीश कोन्सिलची फेलोशिप मिळाली होती इंग्लंडला एक वर्ष अभ्यास करून पदविका मिळवली होती.आदिवासी समाजावर पिएचडी करून समाजामध्ये जनजाग्रुती केली व इतिहासाचे संशोधन करून आदिवासींचा खरा इतिहास पुढे आणला.त्यामुळे आदिवासी क्रांतिकारकांचा इतिहास ख-या अर्थाने पुढे आला.आदिवासी समाजावर त्यांनी ४५ च्या वर ग्रंथ लिहीले.त्या पैकी आदिवासी महादेव कोळी समाजाचे संविधान धर्मग्रंथ समजले जाणारे “सह्याद्रीतील आदिवासी महादेव कोळी” हे पुस्तक होय या पुस्तकाला १९७४-७५ सालचे मराठीतील समाजशास्ञाचे प्रथम पुरस्काराने नामांकित केले होते.त्यांच्या लेखणीसाठी त्यांना १४ विविध पारितोषक मिळाली आहेत.तसेच शिवनेरी भूषण,आदिवासी भूषण,आदिवासी सेवक,व वीर बिरसा मुंडा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.महाराष्ट्र आदिवासी दर्शन,महासंघ वार्ता,आदिवासी संशोधन पञिका यांचे ते अनेक वर्ष संपादक होते.त्यांनी शासनाच्या सेवेत अनेक पदांवर काम केले.आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेवर ते संचालक पदावर राहिले तसेच आदिवासींमध्ये होणारी बोगसांची घुसखोरी रोखण्यासाठी माहिती व बोगस जमात प्रमाणपञ प्रतिबंध कायदा एकमताने पास करून घेतला.डाँ.गोविंद गारे हे पहिले IAS आदिवासी अधिकारी होते.त्यांचा विविध संघटनांमध्ये सक्रिय भाग होता.आदिवासी विकास प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष होते.आयुष्यभर आदिवासी समाजासाठी त्यांनी काम केले.२४ एप्रिल २००६ ला या आदिवासी महामानवाची प्राणज्योत मालवली.आदिवासी समाजाचा एक मोठा कैवारी हरपला.परंतु त्यांचं कार्य त्यांच्या विचारांच्या,पुस्तकांच्या रूपाने जिवंत राहिल.त्यांचा हा लढा चळवळीच्या माध्यमातुन आदिवासी समाज सतत चालू ठेवील. आदिवासींचा खरा इतिहास पुढे आणणारे आदिवासी भूषण डॉ. गोविंद गारे साहेब यांना विनम्र अभिवादन!…
सुत्रसंचलन अमोल गवारी प्रास्ताविक विजय मुठे आभार आकाश धोंगडे
या प्रसंगी महामिञ दत्ता वायचळे,आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेडचे मार्गदर्शक निवृत्ती (काका) भांगरे, सहसंस्थापक विजय मुठे, ट्रायबल आर्मी अध्यक्ष अमोलराजे गवारी,बाळासाहेब मुठे,आकाश धोंगडे,योगेश क्षत्रिय ,सखाराम जगदाळे,सुनिल गोफणे,योगेश मोरे,किरण मुठे,रोहित मुठे,राजेंद्र सालमुठे,चंद्रभान वारुंगसे,प्रकाश गुंजाळ आदि उपस्थित होते.
