
शसातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८८० वा दिवस खरे शिक्षण कशाला म्हणायचे? पुस्तके, ग्रंथ वाचण्याला? निरनिराळ्या प्रकारचे ज्ञान मिळविण्याला? विविध कला, कौशल्य आत्मसात करायला? त्यालाही नाही. ज्या शिक्षणाद्वारे इच्छाशक्तीचा प्रवाह आणि अभिव्यक्ती ही आपल्या स्वतःच्या ताब्यात येतात आणि फलद्रूप होतात, त्यालाच शिक्षण म्हणावे. शिक्षण म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी जे पूर्णत्व आधीचेच विद्यमान आहे त्याचे प्रकटीकरण, त्याचे उन्नयन होय. शिक्षणाचा मूळ उद्येश प्रत्येक व्यक्तिमधील सुप्त गुणांचा विकास करणे हा आहे. केवळ माहिती गोळा करून ती विद्यार्थ्यांच्या डोक्यात कोंबने म्हणजे शिक्षण नाही, शिक्षण घेत असतांना अनेक अडथळे येत असतात, हे अडथळे दूर करून शिक्षकाने ज्ञानदान करावे. *स्वामी विवेकानंद…* *●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
*★ भारतीय सौर २८ चैत्र शके १९४७*
★ चैत्र वद्य/कृष्ण ५
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शुक्रवार दि. १८ एप्रिल २०२५
★ गुडफ्रायडे
★ १३३६ दक्षिण भारतात विजयनगर येथे हरिहर व बुक्क यांनी वैभवशाली हिंदू साम्राज्याची स्थापना केली
★ १८५८ स्त्री शिक्षण व विधवा विवाहाला प्रोत्साहन देणारे समाजसुधारक, भारतरत्न महर्षी आण्णासाहेब धोंडू केशव कर्वे यांचा जन्मदिन
★ १८५९ क्रांतिकारक रामचंद्र पांडुरंग टोपे ऊर्फ तात्या टोपे यांचा स्मृतीदिन.
★ १८९८ पुणे येथे ब्रिटीश अधिकारी रॅन्डचा वध करणारे क्रांतिकारक चाफेकर बंधू यांचा स्मृतीदिन.


