
मुळ डोंगरी (प्रतिनिधी )भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी. संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्याला हक्क मिळवून देणाऱ्या महान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 14 एप्रिल रोजी जयंती मोठ्या उत्साहात सरस्वती माध्यमिक विद्यालय मूळडोंगरी येथे साजरी करण्यात आली. याप्रसंगी लाभलेले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.एस.जी.राठोड साहेब तसेच सचिव सिद्धांत दादा राठोड यांनी प्रमुख अतिथी स्थान स्वीकारून विद्यालयाच्या मुख्याध्यापिका माननीय श्रीमती चव्हाण मॅडम यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेस हार व पुष्पगुच्छ अर्पण केले.तसेच इयत्ता पाचवी ते नववीतील विद्यार्थ्यांनी सुंदर असे भाषण केले. तसेच शिक्षक प्रतिनिधी म्हणून विद्यालयातील सहशिक्षिका श्रीमती बागुल आर्.एम. यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील संघर्षाची यशोगाथा प्रसंगातून वर्णन करत आपले मनोगत व्यक्त केले.तसेच याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
