
सरस्वती माध्यमिक विद्यालय मूळ डोंगरी येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
विद्येविना मती गेली
मतिविना गती गेली
गतीविना नीती गेली
नीतीविना वित्त गेले
वित्ता विना शूद्र खचले
इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले.
छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिला पोवाडा लिहिणारे श्री शिक्षणासाठी समता व सत्यासाठी देह झिजवणारे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती आज 11 एप्रिल रोजी श्री संत सेवालाल महाराज सेवाभावी संस्था संचलित सरस्वती माध्यमिक विद्यालय मुळ डोंगरी येथे उत्साहात साजरी करण्यात आली.याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री एस. जी .राठोड साहेब व सचिव सिद्धांत दादा राठोड व विद्यालयाच्या माननीय मुख्याध्यापिका श्रीमती चव्हाण मॅडम व ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक श्री पवार सर यांनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेस हार व पुष्प अर्पण केले. तसेच विद्यालयातील इयत्ता पाचवी ते नववीतील विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विषयी थोडक्यात विद्यार्थ्यांपुढे मनोगत व्यक्त केले. तसेच विद्यालयातील सहशिक्षक श्री दराडे सर यांनी आपल्या वाणीतून ज्योतिराव फुले यांनी केलेल्या स्त्री शिक्षणाची मूर्तमेढ करून समाजातील अस्पृश्यता जातीव्यवस्थेसाठी लढा दिला तसेच त्यांनी श्री शिक्षणाचा दीप प्रत्येकाच्या जीवनात प्रज्वलित केला.त्यांनी शेती सुधारणा घडवून आणण्यासाठी उपाय सुचवणे या विविध घटकांवर प्रकाश टाकत आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील सहशिक्षिका श्रीमती माळी मॅडम यांनी केले. याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
