
मनमाड ( प्रतिनिधी )मनमाड शहरात गत 40 वर्षा पासून धार्मिक परंपरे मध्ये निरंतर कार्य करणाऱ्या 🕉️ मित्र मंडळ संचलित श्रीराम जन्मोत्सव समिती 2025 तर्फे यंदा प्रथमच श्री हनुमान जन्म उत्सव निमित्ताने शहरातील दत्त मंदिर रोड वरील प्रसिद्ध श्री रुद्र हनुमान मंदिरा सायंकाळी सामूहिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले

या सामूहिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाला महिला युवक व बाल हनुमान भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व भक्तांनी भगव्या टोप्या परिधान केल्या होत्या यावेळी सिया वर रामचंद्र की जय, महाबली बजरंग बली की जय अश्या घोषणा नी परिसर दुमदूमला त्यानंतर श्री रुद्र हनुमान ची महाआरती करण्यात आली व प्रसाद वाटप झाले यंदा सामूहिक हनुमान चालीसा पठण चे हे पहिले वर्ष होते पुढील वर्षा पासून ही परंपरा सुरु राहणार असून मनमाड शहरात 30 पेक्षा जास्त हनुमान मंदिरात हा हनुमान चालीसा पठण कार्यक्रम हनुमान जन्म उत्सव निमित्ताने आयोजित करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला या कार्यक्रमा मध्ये मनमाड शहरातील विविध हिंदुत्ववादी राजकीय पक्ष संघटना,संस्था,मंडळ तसेच हिंदुत्ववादी कार्यकर्ते नी मोठा सहभाग नोंदवला या सामूहिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रमा चे संयोजन श्री राम जन्मोत्सव समिती मनमाड 2025 यांनी केले त्र श्री रुद्र हनुमान मित्र मंडळाचे या कार्यक्रमाला विशेष सहकार्य लाभले
