
नांदगांव आश्रम शाळा सारताळे येथील मुख्याध्यापिका नम्रता पगार (शेवाळे )यांना आदर्श मुख्याध्यापिका पुरस्काराने सन्मानित करताना खासदार भास्कर भगरे आदी ( छाया महेंद्र पगार )
नांदगांव (प्रतिनिधी ) नासिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स अँड नॉन टीचिंग एम्पलोयीज को-ऑपरेटिव्ह सोसायटी तर्फे आश्रमशाळा सारताळे येथील मुख्याध्यापिका नम्रता पगार (शेवाळे) यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. खासदार भास्कर भगरे यांच्या हस्ते आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण, “म्हाडाचे” अध्यक्ष रंजन ठाकरे, ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दर्शन पगार, सोसायटीचे चेअरमन शांताराम देवरे व्हाईस चेअरमन भारतीताई पाटील निंबा कापडणीस , संचालक अरुण पवार, संजय देसले आदि उपस्थित होते.
