
ओझर दि.१२ (वार्ताहर )अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान! एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान !!येथील माधवराव बोरस्ते विद्यालयात समर्पण आणि निर्भयतेचे प्रतिक श्री हनुमान यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक सोपान वाटपाडे उपमुख्याध्यापक धैर्यशील पाटील पर्यवेक्षक दशरथ शिंदे यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षक उपस्थित होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सोपान वाटपाडे होते. याप्रसंगी संगीत शिक्षिका शितल आहेर व गीतमंचाने हनुमान चालीसा, स्तोत्र, भजन आरती मधुर तालासुरात सादर करून जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी रामायणातील श्री हनुमान पौराणिक कथा प्रसंग थोडक्यात सांगितले. फलक रेखाटन कला शिक्षिका मोनाली निकम वर्षा पाटील यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षिका सरोज खालकर यांनी केले.
