
लेखिका तृप्ति पाटिल मुंबई.
“शब्दांकन : व संकलन ✍️ श्री बाळासाहेब चव्हाण… राहणार- विंचूर, तालुका- निफाड, जिल्हा- नाशिक.
.लिंगपिसाट होण्यासाठी एकमेवच कारण म्हणजे हे सोशल मीडिया आहे आणि माणसाचे कमी पडलेले संस्कार आहेत. आज लोक संस्कारहीन झालेले आहेत. बायका, लग्न झालेल्या स्त्रिया, पुरुष आज वाममार्गाला गेले आहेत. तरुण मुली, मुलं गांजा, चरस ह्याच्या मार्गाला गेलेली आहेत. खाणे, पिणे, मजा करणे आणि सेक्स करणे हेच आता लाईफ लोकांचे उरलेले आहे. आणि याला एकमेव कारण म्हणजे ईश्वराला न मानणे, ईश्वराचे ग्रंथ व संतांचे ग्रंथ न वाचणे आणि संस्कार नसणे.आई-वडीलच संस्कारी नसतील तर ते मुलांना संस्कार काय देतील? मुलांना संस्कार देण्यासाठी आई-वडिलांनी संस्कारी असणे गरजेचे आहे. मुलीची आई छोटे कपडे घालून रील्स करत असेल,अनैतिक संबंध ठेवत असते, तर ती आपल्या मुलीला सुशील, संस्कारित मुलगी कशी घडवणार? पुरुष जर स्वतःच बाहेर अनैतिक संबंध ठेवत असेल, घरात बायकोला मारझोड करत असेल, तर तो पुरुष आपल्या मुलाला काय संस्कार देणार?लोक असंस्कारी होण्याचे एकमेव कारण म्हणजे सोशल मीडिया आहे. सोशल मीडियावर काय घ्यावे, काय घेऊ नये याचा विचार लोक करत नाहीत. आज सोशल मीडियावर भरपूर पैसा मिळत असल्यामुळे बायका अंगप्रदर्शन, नग्न व्हिडिओ करतात आणि पुरुष त्या नग्न व्हिडिओला सपोर्ट करून त्या बायकांना अतिशय उत्तेजन करत आहेत. आणि अशा अश्लील व्हिडिओ पाहून पाहून तरुण पिढी वाया जात आहे.काही स्त्रिया, मुली आणि पुरुष आपल्या भारताची संस्कृती जपत आहेत, आपल्या संतांचे ग्रंथ वाचत आहेत आणि किती दुःख आले तरी आपले कर्म उत्तम करत आहेत. अशी पिढी आज आपल्या भारतामध्ये आहे, आपल्या समाजामध्ये आहे. पण त्याच पिढीला, म्हणजे चांगले कर्म करणाऱ्या पिढीला, समाज वाईट ठरवत आहे. म्हणून आज समाजामध्ये लिंगपिसाट वृत्ती वाढत चाललेली आहे.आता मुली मुलांचं शोषण करतात. जसं मुलींवर बलात्कार होतो, तसं आता मुलांवरही अतिप्रसंग होण्याचे प्रकार वाढत चाललेले आहेत. नंगानाच करणे, पार्ट्या करणे, सेक्स करणे, वेगवेगळ्या लोकांबरोबर, बायकांबरोबर संबंध ठेवणे हीच आता लाईफ लोकांना आवडू लागलेली आहे. आणि म्हणून समाजामध्ये लिंगपिसाट विकृती निर्माण झालेली आहे.आणि या विकृतीला जर तुम्हाला ठेचून काढायचं असेल तर भगवद्गीतेशिवाय तुमच्याजवळ पर्याय नाही. कारण भगवद्गीता हा असा एक ग्रंथ आहे की तो विकृत मनुष्यालाही देवमाणूस बनवू शकतो.जर समाजामध्ये ही लिंगपिसाट प्रवृत्ती वाढत गेली तर त्या समाजाची अधोगती होईल. मुलं-मुली वाममार्गाला जातील. संस्कार हे लोकांना कळणार नाहीत, संत कळणार नाहीत, ग्रंथ कळणार नाहीत. खाणे, पिणे, सेक्स करणे हेच लाईफ लोकांना कळेल. आणि हल्लीच्या काळामध्ये हे लाईफ जगणाऱ्या लोकांना समाजात मान-सन्मान मिळतो. पण जे लोक कष्टाने भाजी-भाकरी खातात, चांगले कर्म करतात, त्यांचे मात्र समाज शोषण करत आहे. ही प्रवृत्ती वाढली आहे आणि म्हणून समाज लिंगपिसाट होत चाललेला आहे.या समाजाला लिंगपिसाट वृत्तीपासून रोखायचं असेल तर एकमेव त्याला आधार म्हणजे भगवद्गीता आहे. प्रत्येक घरामध्ये भगवद्गीतेचे वाचन झालं तरच मनुष्य संस्कारित होऊ शकतो, हे ध्यानात घ्या. नाहीतर विकृती वाढत गेली तर समाजाला त्या विकृतीचा परिणाम भयानक रीतीने भोगावा लागेल. मग त्यात आपलं मूलसुद्धा बळी जाईल किंवा आपली पुढची पिढीसुद्धा बळी जाऊ शकते.म्हणून घरोघरी भगवतगीतेचे वाचन होणे गरजेचे आहे.
“शब्दांकन : व संकलन ✍️ श्री बाळासाहेब चव्हाण… राहणार- विंचूर, तालुका- निफाड, जिल्हा- नाशिक.
