
ओझर: शिवराज्याभिषेक दिनानिमित्त प्रतिमापूजन व अभिवादन करताना शिक्षक
ओझर: दि.६ वार्ताहर
येथील ‘मविप्र’ संचलित सहकार महर्षी माधवराव बोरस्ते विद्यालयात शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सोपान वाटपाडे होते. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक सोपान वाटपाडे उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे प्रंतप्रधान अनिता भंडारे यांचे हस्ते होऊन प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी शिक्षक आत्माराम शिंदे दादासाहेब सोनवणे राजश्री मोहन मोहिनी चौधरी पुंडलिक जाधव खंडू हळदे आदी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
