
म्हाळसाकोरे:- (प्रतिनिधी.)येथील मविप्र समाज संचलित आरूढ माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय इयत्ता *बारावी बोर्ड (प्रमाणपत्र) परीक्षेचा निकाल* अधिकृत ऑनलाईन संकेतस्थळावर आज शनिवार दि. २/ ५/ २०२६ रोजी दुपारी एक वाजता जाहीर झाला. यावेळी विद्यालयातील बारावी परीक्षेचा शाखा निहाय निकाल कला शाखेचा ८८.४६ % तर विज्ञान शाखेचा १००% निकाल लागला असून विद्यालयाने उत्कृष्ट निकालांची परंपरा कायम ठेवली आहे. परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या कला शाखेतील १०४ पैकी ९२ विद्यार्थी उत्तीर्ण तर विज्ञान शाखेतील ४० पैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बारावी कला शाखेतील पहिले पाच क्रमांकाचे विद्यार्थी १) सोनाली बाळकृष्ण ठाकरे ४९२ गुण, ८२ %२) आरती त्र्यंबक लाहुडे ४८० गुण ८०%३) तनुजा भास्कर ढेपले ४७३ गुण ७८.८५% ४) अक्षदा देविदास टर्ले ४५९ गुण ७६.५०%५) प्रतिक्षा दत्तात्रय गोसावी ४४६गुण ७४.३३%बारावी विज्ञान शाखा प्रथम पाच क्रमांकाचे विद्यार्थी १) अनुष्का सोमनाथ पडोळे ४२७ गुण ७१.१७%२) विद्या अंकुश बागल ४१४ गुण ६८.६७%३) साक्षी कैलास चव्हाण ४०४गुण ६७.३३%४) कोमल मुकुंद जगताप ३९०गुण ६५.००%५) ईश्वरी बाबाजी मुरकुटे ३८३गुण ६३.८३% वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व उत्तीर्ण झालेले सर्व विद्यार्थी -विद्यार्थिंनींचे आणि त्यांना मार्गदर्शन करणारे दोन्ही शाखा विभागातील कॉलेज टीचर्स यांचे मविप्र समाज संस्थेचे सरचिटणीस मा. ॲड. नितीनजी ठाकरे, सभापती श्री. बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती मा. श्री. देवराम पाटील मोगल, तालुका संचालक मा.श्री. शिवा पाटील गडाख, सर्व शालेय समितीचे अध्यक्ष व सदस्य, प्राचार्या श्रीमती एम.ए. पोटींदे , पर्यवेक्षिका श्रीमती वंदना आहेर, कला विभाग प्रमुख अण्णासाहेब सोनवणे तसेच विज्ञान विभाग प्रमुख श्रीमती एन.एस.कारे, सर्व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या सर्व गुणी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे प्राचार्या श्रीमती एम.ए. पोटींदे. ज्युनिअर कॉलेजचे प्रमुख श्री. अण्णासाहेब सोनवणे, सायन्स विभागाचे श्रीमती एन. एस कारे यांनी मार्गदर्शन केले. तर श्री. वाळुंज सर, श्री. आढाव सर, श्रीमती एस. एस.आचारी, एस.व्ही. गवळी व एस. एस. ढिकले, श्रीमती एस. ए. जामकर, श्रीमती मुठाळ, किशोर गडाख यांनी विशेष परिश्रम घेतले.
