
नाशिकरोड:( प्रतिनिधी)- पळसे येथील नासाका कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालय आणि आदर्श प्राथमिक विद्यामंदिरात महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त ध्वजारोहणासह विविध ठिकाणी नियुक्त झालेल्या माजी विद्यार्थ्यांसह गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.
नासाकाचे अवसायक प्रदीप आव्हाड आणि मानद व्यवस्थापक सुधाकर गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात इयत्ता नववीत सर्वप्रथम आलेल्या मानसी सचिन आडके हिच्या हस्ते आणि मुख्याध्यापक अरुण पगार, चंद्रकांत खानकरी, सामाजिक कार्यकर्ते भास्कर सानप, विलास गायधनी, कवी शरद आडके, कैलास आडके, नवनाथ मुंजे, रवींद्र विंचू, विलास राठोड, मदन गिते, विलास मते, रामचंद्र कुक्कलवाड यांच्यासह माजी विद्यार्थी, पालक आणि पंचक्रोशीतील मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.
स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या सुदर्शन पाटील (नाशिक ग्रामीण पोलीस), मोहन विंचू आणि राजेश रुद्रे (मुंबई पोलीस), माजी सैनिक अरुण लांडगे (वस्तू व सेवा कर विभागात करसहाय्यक), निलेश विंचू (महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती केंद्र, तंत्रज्ञ-३), दानशूर ज्ञानेश्वर सानप, दत्ता मोरे यांच्यासह पाचवी ते नववीत गुणानुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांकप्राप्त अंकिता आडके, शाहू गायधनी, इशिता जाधव, कल्याणी गोसावी, सृष्टी आडके, आर्या आडके, जान्हवी कुक्कलवाड, ओमकार गोरे, धन्वंतरी गायधनी, पूर्वा मोरे, स्वाती कलमे, सोनिया नायक, चेतन गिते, श्रीरंग मुंजे, जान्हवी सानप, अनय मते, मानसी आडके, श्रद्धा आडके, चंदन राठोड, गौरी चौधरी यांचा पाहुण्यांच्या हस्ते एनडीएसटी ॲण्ड एनटी सोसायटीचे उपाध्यक्ष संग्राम करंजकर यांच्या सौजन्याने सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. प्रमुख पाहुणे विलास गायधनी यांच्या शुभ संदेशासह गुणवंतांच्या वतीने अरुण लांडगे यांनी सत्काराला उत्तर देताना मातापिता आणि गुरुजन यांच्यामुळेच स्पर्धा परीक्षेत यशस्वी झाल्याचे विचार मांडले. शिक्षक रवींद्र मालुंजकर यांनी निवेदन केले.
