
भारतात अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे..मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली वाटेल ते बोलणे हा एक घातक प्रकार मोठ्या प्रमाणावर रूढ होत चालला आहे.. अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावर मर्यादा आहेत.मात्र नेते,मंत्री वायफाड बडबड करतात. तोंडात येईल ते बोलतात.कुणीही यावे कोणावरही आरोप प्रत्यारोप करायचा हा सध्या नेत्यांचा जणू राष्ट्रीय कार्यक्रम झाला आहे..एकीकडे महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करत असताना राज्याच्या कृषी मंत्र्यांनी बेभान वक्तव्य करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला..महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या मृत्यूचे थैमान घातले आहे.महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्याचे नाव घेत नाहीत.महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत समोर आलेली आकडेवारी चिंताजनक आहे. महाराष्ट्रातील एकट्या मराठवाडा भागात १०२३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण चिंताजनक असल्याचे मान्य केले आहे. गेल्या ५६ महिन्यांत दररोज सरासरी आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत, हे सरकारने मान्य केले आहे. विधान परिषदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकरी आत्महत्येवर विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात हा धक्कादायक खुलासा झाला. या आकडेवारीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दुर्दशेबद्दल चिंता निर्माण झाली आहे.पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, महाराष्ट्राचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी सोमवार, १० मार्च रोजी पुष्टी केली की गेल्या ५६ महिन्यांत दररोज सरासरी आठ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिवाजीराव गर्जे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.विशेष म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील देवळगावराजा तालुक्यातील शिवनी आरमल नावाच्या गावात राहणारे सरकारी सन्मानित शेतकरी कैलाश नागरे यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याने मोठी खळबळ निर्माण झाली आहे. मृत शेतकऱ्याचा मृतदेह त्याच्याच शेतात आढळला. उल्लेखनीय म्हणजे ४३ वर्षीय या शेतकऱ्याला २०२० मध्ये महाराष्ट्र सरकारने तरुण शेतकरी पुरस्काराने सन्मानित केले होते. गेल्या महिन्यात, ग्रामस्थांना भेडसावणाऱ्या पाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी शेतकरी शिवानी आरमल तलावावर ५ दिवसांचे उपोषणही करत होता. शासकीय सन्मानित शेतकऱ्याच्या आत्महत्येने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.मृत शेतकऱ्याच्या खिशात एक सुसाईड नोटही सापडली आहे, ज्यामध्ये परिसरातील शेतकऱ्यांना पाणी न मिळणे हे आत्महत्येचे कारण सांगितले आहे. मृत शेतकरी कैलाश नागरे यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये परिसरातील १४ गावांमधील शेतकऱ्यांना पाणीपुरवठा व्हावा यासाठी त्यांनी केलेल्या ५ दिवसांच्या उपोषणाचा उल्लेख केला आहे.आत्महत्या केलेल्या चिठ्ठीत शेतकऱ्याने लिहिले आहे की, खडकपूर्णा तलावाच्या डाव्या कालव्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य भगवान मुंडे यांनी मांडलेल्या मागण्या लवकर मान्य कराव्यात. पाण्याची समस्या सुटेपर्यंत माझा मृतदेह येथून हलवू नका. मृत शेतकऱ्याने त्याच्या मागे वडील, पत्नी आणि ३ मुले सोडली आहेत.महाराष्ट्रात शेतकऱ्यांसमोर मृत्यू उभा टाकला असताना कृषी मंत्र्यांनी नको ते वक्तव्य करून शेतकऱ्यांसह तमाम जनतेचा विरोध ओढवून घेतला..आपले चुकले असे वाटताच माफी मागितली..माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला..तरी देखील मी शेतकऱ्यांची माफी मागतो..असे माफीनामा त्यांनी सादर केला.आधी नको ते बोलायचे नंतर क्षमा मागायची हा नेत्यांचा धंदा झालेला आहे.आपली ताकत खूप मोठी आहे हे दर्शवण्यासाठी अशी वक्तव्य केली जातात. त्या मुळे कार्यकर्ते पेटून उठतात.वाटेल ते बोलण्याने आपली प्रसिद्धी होईल..जनता खूप होईल..आपण टिव्ही चॅनल्स वर येऊन हा आशावाद घेऊन बोलघेवडे नेते नको ते बोलता.टिव्ही चॅनेल वाले देखील दिवसभर मुक्ताफळे दाखवितात.. आपला टीआरपी वाढवा हा त्यांचा हेतू असतो..त्यामुळे दिवसभर एकच बातमी दाखविली जाते.बोलघेवड्या नेत्यांमध्ये एक नेते तर दररोज टिव्ही चॅनल्स वर येतात .केंद्रातील व राज्यातील सत्तारूढ सरकार मधील नेत्यांवर वाटेल ते तोंडसुख घेतात..जणू त्यांचा हा राष्ट्रीय कार्यक्रमच झालेला आहे..टीका टिप्पणी करणे हा त्यांचा उद्योग झालेला आहे..अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे आपल्या विचारांना, कल्पनांना आणि भावनांना बोलून, लिहून किंवा कोणत्याही माध्यमांद्वारे व्यक्त करण्याचा अधिकार आहे, पण या स्वातंत्र्याला काही मर्यादा आहेत, जसे की इतरांना हानी पोहोचवणे किंवा कायदा-सुव्यवस्था बिघडवणे हा नाही ,याची जाणीव नेत्यांनी ठेवण्याची गरज आहे.९५६१५९४३०६
