
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२२७ वा दिवस
शिष्य होणे सोपे नाही. पहिली अट ही आहे की जो शिष्य सत्य जाणू इच्छितो त्याने इहलोकी व परलोकी फललाभाची वासना पूर्णपणे सोडली पाहिजे. दुसरी अट शिष्याला सर्व आंतर व बाह्य इंद्रियांचे नियमन करता आले पाहिजे. त्याचप्रमाणे शिष्याच्या ठायी फार मोठी तितिक्षा वा सहनशक्ती असावी लागते.
स्वामी विवेकानंद...
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर चैत्र ११ शके १९४८
★ चैत्र शुद्ध /शुक्ल १४
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८३
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ बुधवार दि. १ एप्रिल २०२६
★ १८८७ मुंबई अग्निशमन दलाची स्थापना.
★ १८९५ भारतीय लष्कर स्थापन झाले.
★ १८८९ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्मदिन
★ १९३५ भारतीय रिझर्व बँकेची स्थापना
★ १९४२ नाशिक जिल्हा अहिल्यादेवी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र स्वर्गीय रोडूआण्णा पाटील यांची ८४ वी जयंती.
