
नाशिक ( प्रतिनिधी. ) दिनांक 26/03/2026 रोजी वासुदेव पार्क उत्तम नगरच्या परिसरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात रामनवमी साजरी केली यंदाचे हे त्यांचे पाचवे वर्ष होते. दिनांक 25/ 3/ 2026 रोजी श्री गोपाल शास्त्री सुराणा यांनी सुंदरकांड सादर केले दुसरे दिवशी 26/ 3 /2026 रोजी सकाळी आठ वाजता श्रीरामांची पालखी मिरवणुकीत परिसरातील महिलांनी स्वतःचे लेझीम तसेच टाळ पथक तयार केले यात 28 वर्ष ते 60 वर्षापर्यंतच्या महिलांचा समावेश होता. या सर्व महिलांना टाळ तसेच लेझीम साठी डॉ. पूजा नंदन यांनी प्रशिक्षण दिले तसेच लहान मुलांचे लाठीकाठी चे शौर्यपथक तयार करण्यात आले होते याचे प्रशिक्षण डॉ. निरंजन नंदन यांनी दिले

.उत्तम नगर स्टॉप वर महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी आमदार सीमाताई हिरे यांनी सदिच्छा भेट दिली त्यांचे समोर महिलांनी लेझीम सादर केली. यानंतर पालखी पुन्हा मंडपात आणून श्री नाना महाले व सौ भामरे ताई यांचे हातून श्रीरामांची आरती करण्यात आली. यानंतर श्रीरामांचा अभिषेक करून सर्व भाविकांना मठ्ठा तसेच उपमा चे वाटप करण्यात आले. सायंकाळच्या प्रहरी प्रख्यात शास्त्रज्ञ श्री ओमप्रकाश जी कुलकर्णी यांचे सीतामाईंच्या अंतःकरणातील प्रभू श्रीराम या विषयावर व्याख्यान झाले व्याख्यानापूर्वी त्यांनी विश्व हिंदू परिषदेचे कार्य तसेच सर्व आयामांची माहिती नागरिकांना दिली. या व्याख्यानात सीतामाईंच्या जन्मापासून ते त्यांच्या धरणीमातेत सामावून जाण्याच्या प्रवासावर प्रकाश झोत टाकण्यात आला. यात सीतामाईसारखे स्त्रियांनी आणि प्रभू श्रीरामांचे पुरुषांनी आजच्या काळात कशाप्रकारे गुण अंगीकारावे यावर मार्गदर्शन करण्यात आले. या व्याख्यानास सर्व स्त्रियांनी भरघोस प्रतिसाद दिला . यानंतर प्रभू श्रीरामांचे आरती करून महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. यासाठी नियोजनाचा भार लक्ष्मी क्लिनिक ,राम ट्रेडर्स, स्वामी समर्थ ज्वेलर्स, कुलकर्णी गुरुजी, फिरके काका, तांबट काका, निळकंठ परिवार, पाटील परिवार ,गांजाळे परिवार, खैरनार परिवार व संदीप येवले पेलला. सर्व नागरिकांनी फुल ना फुलाची पाकळी देऊन योगदान देत महाप्रसादाला भरघोस प्रतिसाद दिला .
यापुढेही दिनांक 25/ 4/ 2026 रोजी खास महिलांसाठी सीता नवमीचे प्रयोजन करण्यात येणार आहे तसेच यापुढेही लेझीम खेळू इच्छिणाऱ्या सर्व महिलांसाठी आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी श्रीराम लेझीम पथका संपर्क करावा
संपर्क : डॉ. पूजा नंदन ८४४६४७४८०९
