मविप्र संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करताना मुख्याध्यापिका ज्योती काळे उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण पर्यवेक्षक अविनाश शेवाळे व सर्व शिक्षक वृंद.
नांदगाव:-( प्रतिनिधी) - मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव मध्ये स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा पुण्यतिथी साजरी करण्यात आला. यावेळी विद्यालयाच्या वतीने महाराजांच्या महान कार्याला आणि बलिदानाला विनम्र अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापिका ज्योती काळे होत्या. प्रारंभी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
प्रमुख वक्ते म्हणून बोलताना उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण यांनी संभाजी महाराजांच्या देदिप्यमान पराक्रमाचा इतिहास मांडला. ते म्हणाले की, "छत्रपती संभाजी महाराज हे केवळ एक योद्धे नव्हते, तर ते अष्टपैलू पंडित आणि स्वराज्याचे खंबीर रक्षक होते. त्यांनी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्याची अस्मिता जपली आणि धर्मासाठी दिलेले त्यांचे बलिदान प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी आहे."
आपल्या अध्यक्षीय मनोगत मुख्याध्यापिका ज्योती काळे यांनी " ज्यांच्या शौर्यापुढे मृत्यूही नतमस्तक झाला, अशा धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा!"
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. ज्ञानेश्वर पगार यांनी केले. त्यांनी संभाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग उलगडून दाखवले.
याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी दिलेला 'जय भवानी, जय शिवाजी' आणि 'छत्रपती संभाजी महाराज की जय' या घोषणांनी शाळा परिसर दुमदुमून गेला होता.