
नाशिकरोड:: ( प्रतिनिधी) -पळसे येथील नासाका कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालय आणि आदर्श प्राथमिक विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
प्रारंभी दोन्हीही विद्यालयाच्या विद्यार्थी, शिक्षिकांसह मुख्याध्यापक अरुण पगार, चंद्रकांत खानकरी यांच्यासह शिक्षक-कर्मचारी यांच्या उपस्थितीत राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. विविधांगी कामगिरीबद्दल माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षिका एस.एल.वाणी, ए.एस.चौधरी, एस.बी.सानप यांचा सन्मानचिन्ह आणि आदर्श प्राथमिक विद्यामंदिरच्या शिक्षिकांचा लेखणी देऊन सन्मान करण्यात आला. ईश्वरी आडके, मानसी वाघचौरे, ईशांत सानप, ईश्वरी गीते, स्वरा गायधनी, कोमल धांडे, शिवन्या राठोड, कल्याणी गोसावी, धन्वंतरी गायधनी, चेतन गीते, साई चौधरी या विद्यार्थ्यांनी भाषण केले. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक अरुण पगार यांनी महिलांच्या कर्तृत्वाचा आढावा घेतला. सांस्कृतिक विभाग प्रमुख कैलास लहांगे यांनी सूत्रसंचालन केले.
