
ओझर: (वार्ताहर)जागतिक महिला दिनानिमित्त येथील बोरस्ते विद्यालयात मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या महिला संचालिका शोभाताई बोरस्ते मुख्याध्यापक सोपान वाटपाडे पिंपळगावचे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.अश्विनकुमार मोरे माखनचोर हॉटेलचे संचालक व कार्यक्रमाचे प्रायोजक संजय शिंदे अनिता शिंदे एलआयसीचे डिव्हिजनल ऑफिसर समाधान चोपडे उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे यांच्या हस्ते जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी संचालिका शोभाताई बोरस्ते होत्या. आपल्या भाषणात त्यांनी शुभेच्छा देत, आज महिलांनी चूल आणि मुल एवढेच न सांभाळता उच्च दर्जाचे शिक्षण आत्मसात करून अनेक महत्त्वाच्या क्षेत्रात उंच भरारी घेतल्याचे त्यांनी सांगितले. डॉ अश्विनकुमार मोरे यांनी ‘आरोग्यम धनसंपदा’ याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले. संजयकुमार शिंदे यांनी शुभेच्छा देऊन, महिलांनी प्रत्येक क्षेत्रात अतिशय दिमाखात कामकाज करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देत महिला दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. फलकलेखन कलाशिक्षिका सविता पवार मोनाली निकम मोहन क्षीरसागर वर्षा पाटील यांनी केले. संगीत शिक्षिका शितल आहेर व गीतमंचाने स्वागतगीत म्हटले. सूत्रसंचालन शिक्षक नरेंद्र डेरले यांनी केले. आभार क्रीडाशिक्षक प्रभाकर लवांड यांनी मानले. कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
