
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२०१ वा दिवस
जर मन प्रशंसेने आनंदित होत असेल तर ते निंदेने दुःखी होणारच. इंद्रियाचे किंवा मनाचे सगळे आनंद क्षणभंगुर आहेत. परंतु आपल्या आतमध्ये एक खरा अद्वितीय आनंद आहे, जो बाहेरील कोणत्याच गोष्टीवर अवलंबून नाही. तो आत्म्याचा आनंद आहे. ज्याला जग आत्मोआनंद म्हणतात. जेवढा आनंद आपल्या आतमध्ये असेल तेवढे आपण जास्त आध्यात्मिक होऊ. आपण आनंदासाठी जगावर अवलंबून राहू नये. आदर्श पुरुष तर ते आहेत जे परमशांती व निःस्तब्धतेमध्येही तीव्र कामाचा तसेच प्रबळ कर्मशीलतेमध्येही वाळवंटातील शांती व निःस्तब्धतेचा अनुभव घेतात.
स्वामी विवेकानंद...
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर फाल्गुन १५ शके १९४७
★ फाल्गुन वद्य /कृष्ण ३
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शुक्रवार दि. ६ मार्च २०२६
★ संकष्ट चतुर्थी
★ छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तिथीनुसार)
★ १८४० बाल्टिमोर कॉलेज ऑफ डेंटल सर्जरी हे पहिले दंतवैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले.
★ राष्ट्रीय दंतवैद्यक दिन.
★ १९५२ आचार्य अत्रे यांनी दिग्दर्शित केलेला ‘श्यामची आई’ चित्रपट प्रदर्शित झाला.
★ १९८२ आदर्श लोकप्रतिनिधी खासदार रामभाऊ म्हाळगी यांचा स्मृतीदिन
★ १९९२प्रसिध्द कादंबरीकार रणजीत देसाई यांचा स्मृतीदिन.
