
नाशिक:-( प्रतिनिधी ) येथे सुरू असलेल्या चौथ्या विश्व मराठी संमेलनात नाशिक जिल्ह्यातील साहित्यिकांचा अनोखा सन्मान करत अखिल भारतीय प्रकाशन संघाच्या नाशिक शाखेने वेगळा पायंडा पाडला.
विश्व मराठी संमेलनाचे स्वागताध्यक्ष ॲड.नितीन ठाकरे, मविप्रचे शिक्षणाधिकारी डॉ.भास्कर ढोके, मसाप जलालपूर शाखेचे कोषाध्यक्ष राजू देसले, प्रकाशक संघाच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष विलास पोतदार, उपाध्यक्ष वसंतराव खैरनार, कार्यवाह सुभाष सबनीस आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते मविप्र संस्थेच्या कर्मवीरांचे चरित्रग्रंथ देत प्राचार्य प्र.द कुलकर्णी, डॉ.किशोर पवार, योगाचार्य अशोक पाटील, सावळीराम तिदमे, डॉ.ज्ञानोबा ढगे, अर्जुन वेलजाळी, माणिकराव गोडसे, वाळू आहेर, रवींद्र दळवी, अलका दराडे, सुनंदा पाटील, वसंतराव पाटील, सोमनाथ साखरे, संदीप देशपांडे, अजय बिरारी, प्रकाश अहिरे, योगेश जाधव, संजय आहेर, श्रीमती व्ही.वाय.पाटील, सप्तर्षी माळी, शुभांगी पाटील, रमेश चौधरी, सुधाकर भामरे, देवचंद महाले, किरण मेतकर, जनार्दन भोये, रवींद्र देवरे, ॲड.संगीता पाटील, मधुकर गिरी, अलका कोठावदे, शुभांगी पाटील, सविता पोतदार, गणेश पवार, सुजाता येवले, वैशाली सूर्यवंशी, नंदन रहाणे, सम्राज्ञी सूर्यवंशी, कविता कासार, रोहिणी टाकळकर-जोशी, पुष्पलता गांगुर्डे, स्नेहा शिंपी, माधुरी अमृतकार, दीपश्री मेणे, विशाल टर्ले, डॉ.शोभा सातभाई, प्रणव सोनार, शिवाजीराव ठाकरे, रवींद्र कांगणे, रतन पिंगट, सीमाराणी बागुल, कविता बिरारी, विलास पंचभाई, अमोल चिने, स्वप्नील धने, अलका कुलकर्णी, डॉ.अंजना भंडारी, गोरख पालवे, देवकी कुलकर्णी, डॉ.स्वप्नील तोरणे, डॉक्टर प्रशांत आंबरे, अपर्णा परदेशी, ज्योती जाधव, रोहिणी जोशी, प्रा.डॉ.संजय पवार, राजेंद्र देसले, प्रकाशक रवींद्र पाटील आदींसह नाशिक जिल्ह्यातील साहित्यिकांचा सन्मान करण्यात आला.
प्रकाशक संघ नाशिक शाखेचे कार्यवाह सुभाष सबनीस यांनी प्रास्ताविक केले. संघाचे अध्यक्ष विलास पोतदार यांनी आभार मानले. संजय आहेर, माणिकराव गोडसे, विशाल टर्ले, गणेश पवार यांनी संयोजन केले. रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रांचालन केले.
