
लेखक:- ज्ञानेश पिसे, नाशिक
आयुष्यात काही क्षण असे येतात की जे अविस्मरणीय असतात. काल परवा पुस्तकाची आई म्हणून ज्यांचा गौरव विविध ठिकाणी होतो आहे अश्या वाचक चळवळीच्या प्रणेत्या भीमाबाई जोंधळे यांची भेट झाली. त्यांचा पहिला रेल्वे प्रवास आणि रेल्वेने दिलेल्या विविध प्रवासी सेवा यांचा अनुभव हा नवीन होता आणि आम्हा रेल्वे सेवका साठी हा अभिमानाचा क्षण होता.पुरस्कार सोहळ्या निम्मित बाई चे नंदिग्राम एक्सप्रेस ने जाणे येणे झाले या प्रवासा दरम्यान त्यांचे सुपुत्र प्रकाशक प्रवीण जोंधळे हे सोबत होते. आनंदायी प्रवास आणि अविस्मरणीय अनुभव देण्यासाठी रेल्वे सदैव तत्पर असते. वाचक चळवळीच्या माध्यमातून कार्य करीत असताना भीमाबाई जोंधळे यांनी अवघ्या महाराष्ट्राला एक प्रेरणा दिली आहे.
भारतीय रेल्वे नेहमीच साहित्यिक आणि वाचन. चळवळीचा पुरस्कार करीत आलेली आहे. विविध भागातून जाणाऱ्या एक्सप्रेस गाडयांना देण्यात आलेली प्रसिद्ध साहित्यिक यांची नावे असो वा पुस्तकांची नावे देऊन एक प्रकारे संस्कृती व अक्षरचळवळ रेल्वे ने जिवंत ठेवली आहे याच प्रवास माध्यमा तुन बाईचा पहिला प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे.भीमाबाई जोंधळे यांनी दूर अंतरावरच्या प्रवासास रेल्वे ला पसंती दिल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. रेल्वेला सेवेची संधी दिल्याबद्दल आम्ही सदैव आपले आभारी राहू! या निम्मिताने वाचन चळवळीला बळ देण्यासाठी छोटासा पुढाकार घेता आला आणि पुस्तकाची आई भीमाबाई यांना अविस्मरणीय अनुभव देता आला हेच काय ते फलित!
