
सिन्नर (प्रतिनिधी)१९ फेब्रुवारी २०२६ जगाला हेवा वाटावा असं अठरा पगड जाती – जमाती धर्मातील मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण करणारे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!
छञपती शिवाजी महाराजांचा लढा हा कोण्या जाती-धर्मा विरूध्द नव्हता तर तो अन्याय,अत्याचारा विरूध्द होता.शिवाजी महाराजांच्या जन्मापुर्वी अदिलशहा, निजामशहाची सत्ता होती त्यांच्या कडे आपलीच माणसे सरदार,जहागीरदार,वतनदार होते.या दोन्ही सत्तांमध्ये एकमेकांत लढाया होत होत्या त्यात आपलीच माणसे मरत होती जनतेवर अन्याय अत्याचार होत होते.माता जिजाऊ शहाजीराजे यांच्या प्रेरणेने छञपती शिवाजी महाराजांनी लोकांमध्ये क्रांतीची प्रेरणा जागृत करून सह्याद्रिच्या डोंगर दऱ्यात राहणाऱ्या अठरापगड जाती-जमाती मावळ्यांना मुस्लिम बांधवांना एकञ करून स्वराज्याची निर्मीती केली.शिवरायांच्या प्रेरणेने प्रेरीत झालेला प्रत्येक मावळा स्वराज्यासाठी आपले प्राण द्यायला तयार होता .जुलूम,अन्याय अत्याचार करणाऱ्यांना वठनीवर आणण्याचं काम शिवरायांनी केलं.शिवरायांच्या स्वराज्यात जाती-धर्म भेदभावाला अन्याय अत्याचाराला थारा नव्हता.म्हणुनच जगाने शिवरायांची प्रेरणा घेतली आहे.
छञपती शिवाजी महाराजानंतर हाच क्रांतीचा लढा पुढे छञपती संभाजी महाराज,महाराणी येसुबाई,महाराणी ताराबाई,आद्यक्रांतिकारक उमाजीराजे नाईक,आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे,आद्यक्रांतिकारक भागोजी नाईक,क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले,छञपती शाहू महाराज व विश्वरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांनी चालू ठेवला.डाँ.बाबासाहेब आंबेडकर हे कोणतेही लिखाण करतांना “जय शिवराय “असे लिहायचे.कोणतेही महापुरूष हे एका समाजाचे नसतात ते सर्वांचे असतात.त्यांनी सर्वांसाठी कार्य केलेले असते.परंतु शुरवीर महापुरूषांना विशिष्ट जातीच्या चौकटीत अडकावून त्यांचं कार्य जगासमोर येत नाही ही शोकांतिका आहे.माञ समाज आता शिकला सवरला आहे खरा इतिहास समजु लागला आहे.म्हणुनच छञपती शिवाजी महाराजांची एकच जयंती जगभर सर्व समावेशक झाली आहे.
जय जिजाऊ जय शिवराय…
जगात लय भारी १९ फेब्रुवारी.
