
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८६७ वा दिवस आपण मनुष्य आहोत. देवाने आपल्याला विचारशक्ती दिली आहे. ती यासाठी की आपण तिचा योग्य प्रकारे वापर करावा, यासाठी नाही की पशूंना कुणीही हाकून घेऊन जावे त्याप्रमाणे आपण देखील कोणीही येऊन काहीही ठासून सांगितले की त्याच्यामागे निमुटपणे चालू लागावे यास्तव मला असे वाटते की आपण आपल्या भूत आणि वर्तमान काळाविषयी सर्व तथ्य सारी माहिती गोळा केली पाहिजे आपला दैदिप्त्यमान इतिहास जाणून घेतला पाहिजे, त्यावर नीट विचार केला पाहिजे व त्याच्या आधारे भविष्याची योजना आखली पाहिजे. आपण निव्वळ भावनेच्या आहारी जाऊ नये.
स्वामी विवेकानंद… ●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर १५ चैत्र शके १९४७*
★ चैत्र शुद्ध /शुक्ल ८
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शनिवार दि. ५ एप्रिल २०२५
★ १६६३ पुण्याच्या लाल महालात शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे छाटली.
★ १९२२ स्त्री शिक्षणाच्या प्रवर्तक, समाजसेविका पंडीता रमाबाई यांचा स्मृतीदिन.


