
श्री .संजय फरताळे. ( क्रांतिवीर महात्मा फुले विद्यालय कुसुर ता.येवला येथील शिक्षक)
येवला ( दिपक उंडे प्रतिनिधी) क्रांतिवीर महात्मा फुले विद्यालय कुसुर ता.येवला येथील शिक्षक श्री संजय फरताळे यांना नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकतर कर्मचारी सोसायटीच्या वतीने गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाला. नाशिक येथील रावसाहेब थोरात सभागृहात 6 एप्रिल 2025 रोजी. शांताराम देवरे यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार आयोजित करण्यात आला. शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे , खासदार भास्कर भगरे ,कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. तसेच क्रांतिवीर महात्मा फुले विद्यालय कुसुर या संस्थेचे अध्यक्ष श्री .अर्जुनराव कोकाटे , तसेच शाळेचे मुख्याध्यापक व तालुका क्रीडा संयोजक श्री .नवनाथ उंडे व शाळेतील शिक्षक व इतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

