
!बोलठाण( प्रतिनिधी)2024 /25 मध्ये झालेल्या विविध शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये बोलठाण हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले, त्यात *कुमार -अजिंक्य विनोद रिंढे याची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली.* व *NMMS या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत बोलठाण विद्यालयाचा कुमार- शिवम संदीप पवार व कुमारी- समृद्धी भगवान चौधरी या दोन विद्यार्थ्यांनी केंद्रीय स्तरावर यश मिळवून शिष्यवृत्ती प्राप्त केली*. सदर विद्यार्थ्यांना नववी ते बारावीपर्यंत 48000 रु. शिष्यवृत्ती मिळणार आहे, यशस्वी विद्यार्थ्यांचे *संस्थेचे अध्यक्ष श्री राजेंद्र नहार, सचिव सुरेंद्र नहाटा व सर्व संचालक मंडळ मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, प्राध्यापक ,शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर बंधू भगिनी व स्पर्धा समितीचे अध्यक्ष श्री कोळी सर, उपाध्यक्ष श्री .जाधव सर व सर्व सदस्यांनी,पालकांनी अभिनंदन केले*. तसेच विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.!!!

