
*सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८६१ वा दिवस* पावित्र्याच्या तेजाने तळपणारे, ईश्वरावरील श्रद्धेचे शुभकवच ल्यालेले, मृगेंद्राचे सामर्थ्य नसानसांत स्फुरत असलेले, दीनदलितांबद्दल हृदयात अपार करुणा असलेले सहस्रों युवक-युवती हिमाचलापासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र संचार करतील, मुक्ती, सेवा आणि सामाजिक उत्थानाचे आणि सर्वप्रकारच्या समानतेचे आवाहन करतील आणि हा देश पौरुषाने मुसमुसून उठेल !
*स्वामी विवेकानंद…* *●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
*★ भारतीय सौर ९ चैत्र शके १९४७*
★ चैत्र शुद्ध /शुक्ल प्रतिपदा
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२६
★ रविवार दि. ३० मार्च २०२५ ★ ‘गुढीपाडवा’ चैत्र नवरात्र प्रारंभ
★ अभ्यंगस्तान संवत्सरारंभ॥ वन्दे संस्कृतमातरम् ॥हरिः ॐ सर्वेभ्यो नूतन संवत्सर- शुभाशयाः॥
★ १६६५ पुरंदर किल्ल्याला वेढा घालणाऱ्या दिलेरखानाशी झुंज देताना मुरारबाजी धारातीर्थी पडले.
★ १९४२ भाषातज्ज्ञ, कोशकार, लेखक आणि कवी वसंत आबाजी डहाके यांचा जन्मदिन
★ १९७६ विख्यात चित्रकार, रंगसम्राट रघुवीर शंकर मुळगावकर यांचा स्मृतीदिन.
★ वर्षामागून वर्ष जाती, बेत मनीचे तसेच राहती, नव्या वर्षी नव्या भेटी, नव्या क्षणांची नवी नाती, नवी पहाट तुमच्यासाठी, शुभेच्छांची गाणी गाती. हिंदू नववर्ष तथा गुढीपाडव्याच्या सर्वांना मंगलमय हार्दिक शुभेच्छा. 🚩🚩🚩🚩


