
जेष्ठ शिक्षिका रंजना वक्टे यांचा सेवापूर्तिनिमित्त सत्कार करतांना मविप्र सरचिटणीस ॳॅड.नितीन ठाकरे,मविप्र संचालक रमेश आबा पिंगळे,मविप्र संचालक डाॅ.सयाजीराव गायकवाड व सर्व मान्यवर.
मखमलाबाद ( वार्ताहर ) = मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मखमलाबाद येथे जेष्ठ शिक्षिका रंजना वक्टे यांचा सेवापूर्ती समारंभ मविप्र सरचिटणीस ॳॅड.नितीन ठाकरे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र संचालक रमेश आबा पिंगळे तर प्रमुख पाहुणे म्हणुन चांदवडचे मविप्र संचालक डाॅ.सयाजीराव गायकवाड,माजी सेवक संचालक डाॅ.अशोकराव पिंगळे,माजी सेवक संचालक रघुनाथ पाचोरकर,माजी शिक्षणाधिकारी उत्तमराव जाधव उपस्थित होते.एन.सी.सी.आर्मी,नेव्हलच्या विद्यार्थ्यांनी सर्व मान्यवरांचे संचालनाद्वारे स्वागत केले व शालेय विद्यार्थिनींनी औक्षण केले.सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वतीपुजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.संगीत शिक्षक तुकाराम तांबे यांच्या गीतमंचातर्फे ईशस्तवन व स्वागतगीत अतिशय सुरेल आवाजात सादर करण्यात आले.प्राचार्य संजय डेर्ले यांनी प्रास्ताविकात सेवापूर्ती कार्यक्रम व विद्यालयाच्या प्रगतीचा धावता आढावा घेऊन मान्यवरांचे शाब्दीक स्वागत केले.सर्व मान्यवरांचा शालेय परिवार तसेच वक्टे,तिडके परिवारातर्फे शाल,सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.मविप्र सरचिटणीस अॅड.नितीन ठाकरे व कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश आबा पिंगळे यांच्या शुभहस्ते निरोपार्थी रंजना विठ्ठल वक्टे,साहेबराव तिडके यांचा शाल,ड्रेस,साडी,सन्मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.शिक्षक मनोगतात हिंदीचे जेष्ठ शिक्षक एन.सी.सी.नेव्हल आॅफीसर अशोक गावले यांनी आपल्या मनोगतात सत्कारार्थी रंजना वक्टे यांच्यासोबत काम करतांना आलेल्या अनुभवांचे विचार मांडले.हिंदीमधील शेरोशायरीचा त्यांनी आपल्या मनोगतात खुपच छान संगम घडविला.वक्टे मॅडम यांचा सहकार्यांसोबत असलेला शांत,अबोल स्वभाव,परंतु विद्यार्थ्यांना शिकवितांना भरपुर बोलणार्या वक्टे मॅडम अतिशय चांगल्या प्रकारे ज्ञानार्जनाचे काम शेवटपर्यंत करत होत्या असेही त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.कु.आर्या सोनवणे हिने आपली आजी वक्टे मॅडमच्या जीवनकार्याविषयी आपले सुंदर विचार मांडले.

.निरोपार्थी रंजना वक्टे यांनी आपल्या मनोगतात संपूर्ण २९ वर्षांचा धावता आढावा घेऊन मविप्र संस्था,शालेय परिवार व सर्वांच्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले.माजी सेवक संचालक रघुनाथ पाचोरकर यांनी जुन्या आठवणींना उजाळा देऊन शुभेच्छा दिल्या.माजी सेवक संचालक डाॅ.अशोकराव पिंगळे यांनी आपल्पा मनोगतात निरोपार्थी रंजना वक्टे यांना सेवापूर्तीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या व शिक्षकांनी आधुनिक शिक्षणाची कास धरावी असेही त्यांनी सांगितले.मविप्र संचालक डाॅ.सयाजीराव गायकवाड यांनी सेवापूर्तीबद्यल मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.तसेच नविन शिक्षकांनी जेष्ठ शिक्षकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा.तन,मन,धनाने विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करावे.मविप्र सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांनी आपल्या मनोगतात मविप्र संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेऊन जुन्या गोष्टींना उजाळा दिला.शिक्षकांनी आजपर्यंत विद्यार्थ्यांना केलेल्या अतिशय चांगल्या ज्ञानाजर्नामुळे हजारो विद्यार्थी आज उच्च पदावर काम करत आहेत.सर्व शिक्षकांच्या योगदानामुळेच मविप्र संस्था नावारुपाला आली आहेत असेही त्यांनी सांगितले.निरोपार्थी रंजना वक्टे यांना संस्थेतर्फे भावी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.अध्यक्षीय मनोगतात मविप्र संचालक रमेश आबा पिंगळे यांनी शिक्षकांनी प्रामाणिकपणे आपले ज्ञानाजर्नाचे काम असेच सुरु ठेवावे तसेच संस्थेची,शाळेची गुणवत्ता वाढविण्यास आपल्या ज्ञानाचा सदुपयोग करावा.निरोपार्थी रंजना वक्टे यांना त्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जेष्ठ शिक्षिका सविता आहेर व प्रमिला शिंदे यांनी केले.आभार प्रदर्शन पर्यवेक्षक सुनिल पाटील यांनी केले.कार्यक्रमास प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्या विमल रायते,पर्यवेक्षक सुनील पाटील,अभिनवचे मुख्याध्यापक प्रमोद ठाकरे,म्हसरुळ अभिनवचे प्रभारी मुख्याध्यापक संतोष उशीर,साहेबराव तिडके,गंगाधर जाधव,लक्ष्मण बाबा तिडके,अजित तिडके,वक्टे व तिडके परिवाराचे नातेवाईक,सर्व शिक्षक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी,एन.सी.सी.आर्मी, नेव्हलचे विद्यार्थी उपस्थित होते.


