
यात्रेच्या निमितताने नस्तंनपुर येथे झालेली भाविकांची प्रचंड गर्दी
न्यायडोंगरी (प्रतिनिधी) शनिवारी आलेली अमावशा मुळे आज नांदगाव तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान अखिल भारतातील साडेतीन शनिपिठांपैकी पुर्ण पीठ असलेले श्रीक्षेत्र नस्तनपूर येथिल शनी देवाची यात्रा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडली आजची अमावस्या दुपारी ४:३० वाजेपर्यंतच असल्याने हा मुहर्त साधण्यासाठी शनी भक्तांनी पहाटे पासुनच दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. हजारो भाविकांनी शनी देवाच्या चरणी नत मस्तक होत प्रार्थना केली.

अनेक भाविक पहाटे पासूनच दर्शनासाठी दाखल झाले होते दुपारी चार वाजेपर्यंत हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती . शनी देवांचे महात्म्य व यात्रेचा मुहर्त साधुन परिसरातून अनेक भागातून पायी दिंड्या शनी देवाच्या दर्शनासाठी नस्तनपूर नगरीत दाखल झाल्या होत्याओम श्री शनेचराय नमः, शनी महाराज कि जय’ चा नारा देत मंदिर परिसर दणाणून गेला होता आजच्या आरतीचे व महापूजेच मानकरी मालेगाव येथिल न्यायाधीश तेजविरसिंह सिंधू सौ सिंधु , नांदगाव चे तहसीलदार श्री सुनिल सैंदाने सौ सैंदाने , मालेगाव येथील उच्च पदस्थ अधिकारी परदेशी मॅडम हे होते या प्रसंगी संस्थान चे जनरल सेक्रेटरी माजी आमदार अनिल आहेर , विश्वस्त उदय पवार,खासेराव सुर्वे, मार्केट कमिटीचे चेअरमन दर्शन आहेर आदी मान्यवर उपस्थित होते .

यात्रा काळात भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून संस्थांनच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येऊन भाविकांना अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या त्यात जागोजागी पिण्यासाठी थंड पाणी, वैद्यकीय सुवीधा,दर्शनासाठी सावली,देणगी स्टॉल ,इत्यादी तर मिठाई , प्रसाद, खाध्य पदार्थांची तसेच लहान मुलांच्या खेळणी ची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटली होती त्यामुळे भाविकांनी सुखकर वातावरणात यात्रेचा लाभ घेतला. यात्रा उत्सव शांततेत पार पडावी म्हणून यात्रा उत्सव समिती चे अध्यक्ष डॉ शरदचंद्र आहेर, संदीप मवाळ, हरेश्वर सुर्वे, सुनिल पवार, भैया पाटील, भास्कर सोळसे यांचे बरोबरच संस्थान चे सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
