
सिन्नर ( प्रतिनिधी ) छञपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास व संभाजी राजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली*.*चैत्र प्रतिपदा मराठी नववर्षांच्या स्वागतासाठी आपल्या घरांवर एकपाती भगवी पताका उभारून स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुजन करून त्यांना अभिवादन करवे असे आवाहन या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामिञ दत्ता वायचळे केले*,छञपती संभाजी महाराज हे शुरवीर धाडसी राजपुञ होते.त्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण नावाचा संस्क्रुत ग्रंथ लिहीला.त्या ग्रंथामध्ये तरूणांना काही नियम सांगितले १) जुगार खेळू नये.२)खोटं बोलू नये.३)पर स्ञीचं व्यसन करू नये.४) मादक द्रव्याचं सेवन करू नये.५)असुरक्षित एकट्याने लांब लांब प्रवास करू नये.६)मनातील इंगित कोणाला सांगु नये.७)वाईट माणसांची संगत करू नये.हे सात राजशिष्टाचार सांगितले .असे काॅम्रेड हरिभाऊ तांबे म्हणाले

काहिंनी शंभूराजांना व्यसनाधीन,स्ञीलंपट,वाईट असे रंगविले गेले.त्यांना बदनाम केले गेले.शंभूराजांना सतरा भाषा येत होत्या.छञपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले स्वराज्य बहुजनांना सोबत घेऊन शंभु राजांनी पुढे चालविले. असे विजय मुठे म्हणाले शिवरायांच्या म्रुत्यूनंतर अनेक सत्तांना वाटत होते की,स्वराज्य आता टिकणार नाही.परंतु शंभूराजांनी स्वराज्यातील एकही किल्ला दुस-यांच्या ताब्यात जाऊन दिला नाही.असे डाॅ.आर टी.जाधव म्हणाले संभाजी महाराज यांनी आयुष्यात अनेक लढाया लढल्या परंतु एकही लढाई शंभुराजे हरलेले नाहीत विष्णू वाघ म्हणाले. काही केल्या स्वराज्याची सत्ता आपल्या हातात येत नाही म्हणुन अनेक जन त्यांचे शञू बनले.त्यामुळे काही स्वराज्य द्वेष्टींनी कपटाने संभाजी राजांना पकडून औरंगजेबाच्या हवाली केले व त्यांना हलाहल करून मारले आणि त्यांच्या शरीराचे तुकडे इंद्रायणी नदी मध्ये टाकण्यात आले.औरंगजेबाने फर्मान केले की,जो कोणी शंभूराजांना अग्निडाग देईल त्यांचे असेच हाल होतील. त्यामुळे कोणी अग्निडाग देण्यासाठी पुढे येत नव्हतं परंतु महार वाड्यातील गोविंद महार व साथीदार पुढे आले आणि त्यांनी शंभूराजांच्या शरीराचे तुकडे गोळाकरून ते शिवले व त्यांना महार वाड्यात अग्निडाग दिला.त्यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता राजांसाठी बलिदान दिले.अशा न्यायी,कुणाला शरण न जाणा-या शंभू राजास विनम्र अभिवादन!भाऊसाहेब पवार,यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सुञसंचलन प्रकाश माळी प्रास्ताविक विजय मुठे तर चंद्रदास रामटे यांनी आभार मानले. यावेळी महामित्र दत्ता वायचळे काॅम्रेड हरिभाऊ तांबे आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड चे सहसंस्थापक विजय मुठे डाॅ.आर.टी जाधव वृक्षमित्र विष्णू वाघ सचिन आहेर भाऊसाहेब शिलावट यशवंत कांगणे दिनकर काळे प्रकाश माळी नामदेव कुटे, राजेंद्र सातपुते, गोपीनाथ वाजे , गणपत काळे राजेंद्र लोखंडे अक्षदा रायजादे उल्हास अवसकर भाऊसाहेब पवार सोपन सातपुते संजय पांडे राजेंद्र देशमुख, अदि उपस्थित होते.
