
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८६० वा दिवस श्रेष्ठ महात्मे शांत आणि अज्ञात असतात. त्यांच्याजवळ विचारांची मोठी शक्ती असते. त्यांचा विश्वास असतो, की ते गुहेत जाऊन दाराला शिळा लावून बसले आणि त्यांनी केवळ पाच सत्य विचारांचे प्रक्षेपण केले तरी ते पाच विचार चिरंतर होतील. ते महापर्वत उल्लंघून, महासागर ओलांडून सर्व जगतात संचारतील मानवजातीच्या बुद्धीत आणि ह्रदयात ते सखोल जाऊन पोहोचतील आणि स्त्री-पुरुषांमध्ये त्या विचारांचे आचरण करण्याची प्रेरणा निर्माण करतील. *स्वामी विवेकानंद…* *●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●**
★ भारतीय सौर ८ चैत्र शके १९४७*
★ फाल्गुन अमावस्या
★ शालिवाहन शके १९४६
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२६
★ शनिवार दि. २९ मार्च २०२५ ★ १६८९ हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन (तिथीनुसार)
★१९६२ भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते पिंपरी येथील हिंदुस्थान अँटिबायोटिक्सच्या पेनिसिलिन कारखान्यातील स्ट्रेप्टोमायसिनच्या उत्पादन प्रकल्पाचे अनावरण झाले.
★ राष्ट्रीय नौका दिन…
