
ऐतिहासिक ग्रंथ ‘जनकल्याण राजा छत्रपती शिवराय’ या शिवचरित्र ग्रंथाच्या लेखनाबद्दल शिवचरित्रकार व. ओझरच्या बोरस्ते विद्यालयाचे मुख्याध्यापक सोपान वाटपाडे पत्नी प्रतिभा यांचा सत्कार श्रीक्षेत्र पाचोरे वणी येथे करतांना गुरुवर्य योगेश महाराज गवारे आदी
ओझर (प्रतिनिधी ) मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या माधवराव बोरस्ते विद्यालय, ओझर मिग चे मुख्याध्यापक तथा शिवचरित्रकार सोपान वाटपाडे यांचा प्रति जेजुरी मल्हारी मार्तंड देवस्थान पाचोरे वणी येथे संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य योगेश महाराज गवारे यांच्या हस्ते पत्नी प्रतिभासह हृदय सन्मान करण्यात आला. त्यांनी ऐतिहासिक असे जनकल्याण राजा छत्रपती शिवराय हे महाराजांचे संपूर्ण शिवचरित्र तसेच आठवणीतील आई वडील हे लोकप्रिय पुस्तकाचे लेखन केले. समाज प्रबोधनाच्या माध्यमातून आजवर महाराष्ट्रात व महाराष्ट्राच्या बाहेर शेकडो शिवशंभू चरित्रावरती व्याख्याने देऊन शिवछत्रपतींचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम केले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन प्रति जेजुरी संस्थाने नुकताच त्यांचा कार्याचा सन्मान केला. यावेळी बोलताना गुरुवर्य योगेश महाराज म्हणाले की, सोपान वाटपडे यांनी पाचोरेवणी गावाबरोबरच जिल्ह्याचे नाव महाराष्ट्रभर पोहोचविण्याचे काम केले आहे. यावेळी परिसरातील शिवप्रेमी, मल्हार प्रेमी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मल्हार सेवक दत्ता गवांदे व संतोष गवारे यांनी केले तर आभार विशाल डेरे यांनी मानले…
