
“स्वप्न पाहण्याची हिंमत जिथे मिळते..,
ती स्वप्न साकार करण्याची ताकद जिथे मिळते..,
अशा ह्या विद्येच्या मंदिरात आज यशाचा उत्सव साजरा झाला..!”
नांदगाव (प्रतिनिधी ) दि.१८ डिसेंबर२५ येथील वैजनाथ जिजाजी (व्हि.जे.) विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात वर्षभरातील विविध परीक्षा, स्पर्धांमध्ये सुयश प्राप्त केलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवर अतिथींच्या हस्ते गुणगौरव समारंभ संपन्न झाला.
ह्यावेळी वर्षभरातील शैक्षणिक,विविध स्पर्धा परीक्षा,क्रीडा तसेच सांस्कृतिक विभागातील गुणवंत तथा बक्षिसपाञ विद्यार्थ्यांसह शाळेतील काही आदर्श तथा कर्तृत्ववान शिक्षकांनाही प्रमाणपञ,भेटवस्तू देवून प्रमुख अतिथींच्या हस्ते गौरविले गेले.

परधाडी (नांदगाव ) येथील प्रतिष्ठित व्यावसायिक, औषध निर्माण संदर्भात आंतरराष्ट्रीय परिषदांत सहभाग घेतलेले.., A.I.O.C.D फार्मा लि.मुंबई चे डायरेक्टर तथा शाळेचे माजी विद्यार्थी मान.श्री. रविंद्र बाजीराव पवार हे कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ना.शि.प्र.मंडळाचे ज्येष्ठ कार्यकारीणी सदस्य, शाळा समिती अध्यक्ष मान.श्री.संजीव धामणे ह्यांनी भूषविले. ह्यावेळी शाळेतील एन.सी.सी. कॕडेट्सकडून मानवंदना स्विकारल्यावर कार्यक्रमाच्या सुरूवातीला सर्व मान्यवरांनी शाळेचे संस्थापक कै.वैजनाथ रत्नपारखी व शाळेचे प्रथम . र क्र.१ वरील विद्यार्थी कै.मनोहरतात्या रत्नपारखी ह्यांच्यासह सरस्वतीदेवीचे प्रतिमापूजन करुन दिपप्रज्वलन केले.
मुख्याध्यापक श्री. लक्ष्मीकांत ठाकरे ह्यांनी आपल्या प्रास्ताविकातून शाळेच्या ऊज्वल शैक्षणिक प्रगतीचा आढावा सादर करतांना विवीध स्पर्धापरीक्षा, एस.एस.सी. २०२५ चा ऊज्वल निकाल, विज्ञान मेळावा, संगणक, क्रीडा, फंक्शनल,चिञकला आदी विषयांतील यशस्वी विद्यार्थ्यांसह गुणवंत शिक्षकांच्याही कर्तृत्वाचा वा यशाचा आलेख ह्यावेळी मांडला .

नांदगाव सारख्या ग्रामीण परीसरात सुविधांचा वाणवा असतांना शाळेतील विद्यार्थ्यांनी सर्व विभागांत, सर्व परीक्षांमध्ये दाखवलेली गुणवत्तेची चुणूक, शिक्षकांना मिळालेले पुरस्कार, शाळेने जिल्ह्यात एकमेवरीत्या १९९० पासून ‘तांञिक’ शिक्षणाचा घातलेला व्यावसायिक शिक्षणाचा निर्णायक पाया..; आदी बाबींविषयी दिलखुलासपणे कौतुक करतांनाच ह्याद्वारा एकप्रकारे विद्यार्थ्यांच्या बालपणीच शाळेने यशाचा ढाचा तयार करून दिला.., असे गौरवोदगार ह्यावेळी मान.श्री. रविंद्र पवार ह्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
ह्याप्रसंगी त्यांनी सर्व शिक्षकांमध्ये समाज घडविण्याची खरी ताकद आहे असे म्हणत सर्वांना शुभेच्छा दिल्या..; विद्यार्थ्यांनाही नविन ज्ञान आत्मसात करतांना ‘मोबाईल’ चा चांगला वापर करण्याचा ‘सल्ला’वजा कानमंञही त्यांनी ह्यावेळी दिला.ह्याप्रसंगी शाळेने कार्यक्रमाला ‘अतिथी’ म्हणून बोलविल्याने आपणांस खरा आनंद मिळाल्याचे सांगत त्यांनी मुख्याध्यापक ह्यांचेकडे शाळेविषयी कृतज्ञता म्हणून रू. ११,०००/- चा धनादेशही सुपूर्त केला. शाळेमध्ये वाढत असलेले ‘सुवर्ण’ पदक प्राप्त विद्यार्थी- खेळाडूंचे प्रमाण ह्याकडे प्रकाशझोत टाकतांना कार्यक्रमाचे अध्यक्ष मान.श्री. संजीव धामणे ह्यांनी शाळेचे कर्णधार अर्थात मुख्याध्यापक श्री. लक्ष्मीकांत ठाकरे ह्यांचे आवर्जून कौतुक आपल्या अध्यक्षीय मनोगतातून केले. वर्षभरातील शैक्षणिक,क्रीडा,एन.सी.सी. व सांस्कृतिक विभागातील बक्षिसपाञ विद्यार्थ्यांना व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपञ व भेटवस्तू देवून बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
तत्पूर्वी श्रीम. सूनिता देवरे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली गीतमंचातील विद्यार्थीनींनी ‘सत्यम शिवम् सुंदरा..’ हे सुरेल स्वरातील ईशस्तवणही सादर केले.
इ ८ वी तील विद्यार्थीनी स्वहस्ते तयार केलेले आकर्षक ‘वारली’ पेंटींग्ज प्रमुख मान्यवरांना देण्यात आले. श्री. विजय चोपडा, डाॕ.चव्हाण , श्री.महावीर सुराणा आदी मान्यवरांनी रोख रकमेचे पारितोषिक देवून गौरव केला.
तसेच शाळेतील सन्मा. पदाधिकारी व शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक स्मृतीचिन्ह (मेडल्स) देवून सन्मानित करण्यात आले. (कंसात सन्मान निमित्त.मान.श्री. संजीव धामणे_ (शाळेला India Activities Excellence Award प्राप्तमान.श्री. लक्ष्मीकांत ठाकरे(Leadership of Education पुरस्कार प्राप्त)श्री. ज्ञानेश्वर डंबाळे(बासरीवादन विभागस्तरावर निवड)श्री. कुणाल जोशी
(वक्तृत्व स्पर्धा- जिल्हास्तरीय निवड)श्री. अनिल तांबेकर
(जि.प. आॕलिंपियाड विभागस्तरावर निवड)श्री. भास्कर मधे
(राष्ट्रीय समरसता पुरस्कार )सौ. रूपाली झोडगेकर
(ग.शं.डोंगरे उपक्रमशील भाषा शिक्षक पुरस्कार श्रीम. विद्या महाले_ (व्हीजन नाशिक विभागीय राज्यस्तरीय पुरस्कार )श्री. गणपत बेझेकर (आदर्श ‘शिक्षण तपस्वी’ पुरस्कार ) श्री.विजय चव्हाण (पुरोहीत एकांकीका स्पर्धा प्रमुख )श्री. शशिकांत खांडवी_
(जॕक्सन पाॕलाॕक पुरस्कार राज्यस्तरीय रंगोत्सव स्पर्धेत शाळेला प्राप्त गोल्ड,सिल्व्हर व ब्रांझ मेडल्स योगदान तसेच वारली चिञप्रदर्शन)श्री. राजेश भामरे
(जि.प. प्रवासवर्णन स्पर्धा -द्वितीय क्रमांक )श्रीम. सूनिता देवरे
(किकबाॕक्सिंग राष्ट्रीय स्तर खेळाडू निवड)श्री. खंडू चौधरी व श्री. ज्ञानेश जाधव(राज्यस्तरावर कूस्ती खेळाडू निवड)श्री. गणेश गोटे(राज्यस्तरीय रंगोत्सव स्पर्धा आॕनलाईन योगदान )श्री. विलास काकळीज
(काव्यलेखन राज्य स्पर्धा सहभाग) सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संघ व शिक्षकांना शाळेतील कलाशिक्षक श्री. चंद्रकांत दाभाडे व त्यांचे सुपूञ आर्की.श्री.प्रतिक दाभाडे ह्यांच्याकडून स्मृतीचिन्हं (मेडल्स्) उपलब्ध करुन देण्यात आले. प्रमुख आतिथींच्या हस्ते श्री. दाभाडे सरांना पुष्प देवून सन्मानित करण्यात आले..; तसेच मांडवड (नांदगाव) येथील प्रतिष्ठित नागरीक श्री. अशोक निकम ह्यांनीही विजेत्या खेळाडूंना क्रीडास्पर्धांतील यशाबद्दल स्मृतीचिन्हं (मेडल्स्) उपलब्ध करुन दिले.श्री. सुदेश नरसकर ह्यांनी अतिथींचा परिचय करून दिला. उपमुख्याध्यापक डाॕ. श्री.जोगेश्वर नांदुरकर ह्यांनी मंचावरील मान्यवरांचे पुष्प देवून स्वागत केले उपस्थित मान्यवरांचे आभारही मानले.कार्यक्रमाचे सूञसंचलन सौ. रूपाली झोडगेकर ह्यांनी केले बक्षिसयादींचे वाचन श्रीम.दिपाली सांगळे, श्रीम.सूनिता देवरे व श्री. गुलाब पाटील ह्यांनी केले.
पारितोषिक वितरण समारंभाची सांगता करण्यात आली.
प्रसंगी नांदगाव शहरातील ज्येष्ठ विधीज्ञ व माजी विद्यार्थी अॕड.श्री. जयकुमार कासलीवाल, वाखारी शाळेचे अध्यक्ष श्री. विजय चोपडा, ज्येष्ठ पञकार श्री.संजीव निकम, डाॕ. गणेश चव्हान, श्री.महावीर सुराणा, श्री. प्रसाद गुंजाळ, पा.शि. संघ सदस्य श्री.अनिल थोरे, सौ. कुंभारे, सौ. सोनवणे, सौ. सानप, ज्येष्ठ शिक्षक श्री. गुलाब मोरे, श्री. चद्रकांत दाभाडे, संस्थेचे अॕकेडमिक बोर्ड सदस्य शिक्षक प्रतिनीधी श्री. प्रविण अहिरे,श्री. सुरेश नवसारे, शालेय पंतप्रधान कु. भूमिका हिरे, कु. कृष्णा सुर्यवंशी आदी मान्यवरही व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाला शाळेचे माजी शिक्षक श्री. जगन्नाथ साळूंके, श्री. भैय्यासाहेब चव्हाण, शहरातील पञकार बंधु तसेच विद्यार्थ्यांचे पालक आदींनी उपस्थिती लावली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पदाधिकारी विविध समितीतील सर्व शिक्षक-शिक्षिका तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले. !
