
ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- नवनाथ गायकर यांजकडुन
राज्यात सत्ता कुणाचीही असो. ईगतपुरी त्रंयबकेश्वर विधानसभा मतदारसंघातील आमदार कोणाचाही असो.नाशिक जिल्हयाचा खासदार कुठल्याही पक्षाचा असो.गेली दोन तीन दशके ईगतपुरी व त्रंयबकेश्वर शहर नगरपालिकेचा निकाल कधीच बदललेला नाही.
ईगतपुरी शहरावर संजय इंदुलकर यांचे एकहाती वर्चस्व असुन शिवसेनेचा भगवा सातत्याने फडकावण्याचा अद्भुत पराक्रम त्यांनी केलेला आहे.
तर भाजपाचा श्रीक्षेत्र त्रंयबकेश्वर ही धार्मिक नगरी कायमची बालेकिल्ला राहिली आहे.
राज्यात महानगर पालिका, नगर पालिका निवडणुकाचां बिगुल वाजला असुन, राजकिय कुरुक्षेत्रावर रणधुमाळी
सुरु झाली आहे.शहरी कारभार्या पाठोपाठ आता गाव कारभारी यांनाही निवडणुकीची प्रतिक्षा आहे.मात्र वरिष्ठ पातळीवर महायुती, आघाडी वा युती या बाबतचे चित्र अदयापही स्पष्ट नसल्याने संभ्रम आहे.त्यामुळे लढाया स्वतंत्र होणार की मैत्रीपुर्ण या बाबत गोंधळ आहे. दरम्यान इच्छुकाचीं प्रचंड भाऊगर्दी पाहता महायुती वा आघाडी झाल्यास मोठया प्रमाणावर बंडखोरीची शक्यता नाकारता येत नाही.त्या ऐवजी सगळयानींच स्वबळ आजमावे अशी आग्रही मागणी जोर धरत आहे.
ईगतपुरी त्रंयबकेश्वर विधानसभा मतदारसंघातील ईगतपुरी व त्रंयबकेश्वर या दोन्ही नगरपालिकाच्यां निवडणुकाचीं रणधुमाळी सुरु झालेली आहे. ईगतपुरी हे मुंबई शहराचे प्रवेशद्वार व थंड हवेचे ठिकाण म्हणुन सुप्रसिध्द असल्याने या शहरातील लढतीकडे सगळयाचें लक्ष लागुन आहे.तर त्रंयबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक व प्रसिद्ध असल्याने या धार्मिक नगरीच्या निकालाकडे विशेष लक्ष आहे.महत्त्वाची बाब म्हंणजे सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर आहे. त्यामुळे येथील सत्तेसही महत्त्व प्राप्त झाले आहे.
या दोन्ही नगरपालिकाचें वैशिष्टयै म्हंणजे सलग तीन दशकापासुन राज्य व केंद्रात सत्तेवर कुणीही येवो पण ईगतपुरी शहरावर संजय इंदुलकर यांचे नेतृत्त्वाखाली शिवसेनेचा भगवा व तुंगाराचे नेतृत्त्वाखाली त्रंयबकेश्वर शहरावर भाजपचा भगवा हे ठरलेले आहे.अगदी येथील आमदार, खासदारानीं प्रयत्न करुनही या निकालात कसलाही फरक पडलेला नाही.
यंदा श्रीक्षेत्र त्रंयबकेश्वर मध्ये सत्तेसाठी रस्सीखेच होणार असली तरी भाजप महायुतीचा दबदबा येथे कायम राहिल अशी चर्चा आहे.
कारण येथील बरेचसे दिग्गज नेते हे भाजप वा महायुती त असल्याने येथे विरोधक दुबळा असल्याचे चित्र जाणवत आहे.
ईगतपुरी शहरात मात्र धक्कादायक घडामोडी घडलेल्या आहेत. येथील अपवाद वगळता शिवसेना उबाठा गटाने भाजपात प्रवेश करत सर्वानां चकित केले आहे.
ईगतपुरी शहरावर थोडी थिडकी नव्हे तर तब्बल तीस वर्ष एकहाती सत्ता ठेवण्याची किमया संजय इंदुलकर या करिष्माई नेत्याने केली आहे.
पक्षाशी एकनिष्ठ असणारे इंदुलकर यांनी हवेची दिशा अचुक ओळखत भाजपाची साथ धरल्याने येथे शिवसेना गलितगात्र झाली आहे.आता खरा सामना आघाडी व भाजपा महायुतीतच रंगणार असुन सलग सात वेळा ईगतपुरी शहरावर कब्जा मिळवण्याचा भीम पराक्रम इंदुलकर करतात काय ? याकडेच सगळे लक्ष लागलेले आहे.
