
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८५८ वा दिवस मानवजातीचे रक्षक होण्याचा आपण कधी आव आणू नये. केवळ आपले मन शुद्ध ठेवण्याचा आपण सतत प्रयत्न करावा. कोणाविषयी मनात किंतू-परंतु बाळगू नये. याचा परिणाम असा होईल की आपल्याकडून इतरांचे कधीच अहित होणार नाही तर नेहमी हितच होईल. आपण इतरांसाठी सहाय्यक ठरू. स्वामी विवेकानंद… ●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर ६ चैत्र शके १९४७*★ फाल्गुन वद्य /कृष्ण १३
★ शालिवाहन शके १९४६
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२६
★ गुरुवार दि. २७ मार्च २०२५ ★ जागतिक रंगभूमी दिन
★ १८९८ हिंदुस्थानी शिक्षणतज्ञ सर सय्यद अहमद खान यांचा स्मृतीदिन.
*संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*


