
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१०२ वा दिवस
आपण कर्माविषयी सदा असंतोष प्रकट करीत असतो त्याचे कारण म्हणजे आपण सर्वजण स्वतःला फार थोर समजत असतो, हे होय. परंतु मनापासून व प्रामाणिकपणे कर्म करू लागताच अगदी क्षुद्र कर्तव्येही चांगल्या रीतीने पार पाडण्यास आपण किती असमर्थ आहोत हे आपल्याला उमजते, आणि त्यायोगे स्वतःसंबंधी आपण ज्या साऱ्या मोठमोठ्या कल्पना उराशी बाळगून होतो त्या मग स्वप्नासारख्या विरू लागतात. आमची कर्तव्य मुख्यतः आमच्या भोवतालच्या एकंदर परिस्थितीने ठरत असतात. कर्तव्यांमध्ये लहान मोठे काही असू शकत नाही फलासक्त कर्मीच आपल्या वाट्याला आलेल्या कर्तव्याविषयी कुरकुर करीत असतो. निष्काम अनासक्त कर्मयोग्याच्या दृष्टीने सर्वच कर्तव्य समान होत.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर ६ अग्रहायण शके १९४७
★ मार्गशीर्ष शुध्द /शुक्ल ७
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ गुरुवार दि. २७ नोव्हेंबर २०२५
★ १८८८ लोकसभेचे पहिले अध्यक्ष गणेश वासुदेव मावलंकर यांचा जन्मदिन.
★ १९५२ वैदिक धर्माचे पुरस्कर्ते, पाश्चात्य व पौर्वात्य तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, मीमांसक व भाष्यकार शंकर रामचंद्र तथा ‘अहिताग्नी’
राजवाडे यांचा स्मृतीदिन
★ १९७८ ‘राष्ट्रसेविका समिती’ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्त्री शाखेच्या संस्थापिका लक्ष्मीबाई केळकर यांचा स्मृतिदिन.
