
इगतपुरी (प्रतिनिधी ) महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई आयोजित निवासी शाहिरी प्रशिक्षण शिबिर , तथा प्रयोगसिद्ध लोककलांचे प्रशिक्षण राष्ट्रसंत बंकट स्वामी महाराज मंगल कार्यालय वाघेरे – नाशिक येथे १५ मार्च २०२५ ते २४ मार्च २०२५ दरम्यान आयोजीत करण्यात आले होते.महाराष्ट्रातल्या शाहिरी परंपरेचे सांस्कृतिक व सामाजिक मूल्य संवर्धनाचा वसा व वारसा जतन केला जात असताना शिवकालीन इतिहासापासून ते असतागायत अनेक माता भर शाहिरांनी आपल्या जोशपुर्ण कार्यामधुन भारतीय स्वातंत्र्य संग्राम, परकीय आक्रमण ,संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, गोवा मुक्ती संग्राम आणि राष्ट्र विकासाच्या मोहिमेत प्रेरणादायी असे योगदान दिले आहे. आणि या अशाच समृद्ध परंपरेला नेटाने पुढे चालवण्यासाठी व २१ व्या शतकाचे समर्थपणे आव्हान पेलण्यासाठी चारित्र्यवान, सदाचारी, सुविचारी, संस्कारशील असे शाहीर निर्माण व्हावे. ही शासनाची धारणा आहे. या पार्श्वभूमीतून महाराष्ट्र शासनातर्फे प्रतिवर्षी कीर्तन ,तमाशा व शाहिरी या प्रयोगासिद्ध कलांचे प्रशिक्षण शिबिरे आयोजित केले जातात. या उपक्रमाद्वारे पारंपारिक लोककलांचे संगोपन व संवर्धानाबरोबरच उमेडीच्या कलावंतांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येते. २०२५ साठी वाघेरे, तालुका इगतपुरी येथे आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात २७ शिबिरार्थींना प्रवेश घेतला होता

. महाराष्ट्रातील प्रतिभा संपन्न शाहीर तसेच या परंपराचे सखोल अभ्यासक, तज्ञ यांना निमंत्रित करण्यात आले होते. शिबिर समारोप समारंभात प्रशिक्षणार्थी यांनी आपला कलाविष्कार “ही ललकारी शाहिरांची” हा कार्यक्रम प्रमुख अतिथी व मान्यवरांच्या उपस्थितीत सादर करण्यात आला.या कार्यक्रमासाठी श्री. विकास खारगे (भा.प्र.से.) मा. मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव व श्री. बिभीषण चौरे संचालक ,सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर संचालक शाहीर उत्तम लक्ष्मीबाई रामचंद्र गायकर निवासी शाहिरी प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले. निवासी शाहिरी प्रशिक्षण शिबीरातसुरेश भिसे (जालना) भीमराव मोरे (जाफराबाद) दत्तराज जोशी (नागपूर) राजेंद्र बावनकुळे (नागपूर) छगन बावनकुळे (नागपूर) याज्ञवल्य याज्ञवल्क्य जोशी (नागपूर,)प्रशांत भिसे (सिन्नर) रवींद्र वरुटे (टाकेद) रवींद्र रोकडे(मुंढेगाव) अशोक चांदूडे (नाशिक) शरद लोहकरे (कल्याण) आकाश पाटील (पाथर्डी) शिवाजी गायकर (संभाजीनगर) किरण बोधक (शहापूर) रवींद्र वाघ (मुलुंड) गणपत बंदावणे(मुकणे) पंढरीनाथ भिसे (अकोले )दौलत घारे (काळुसते) प्रवीण बोधक (ठाणे) गणेश बगाड (अहिल्यानगर) राधिका भागडे (मानवेढे) कल्पेश कांबळे (लातूर) ऋषिकेश नरवटे (मुकणे) जगदीश शिंदे (समनेरे) मच्छिंद्र गणाचार्य (वाघेरे) आकाश गणाचार्य (वाघेरे) ओंकार गणाचार्य (घोटी) विशाल गणाचार्य (घोटी) ओंकार गायकर,दुर्गेश गायकर (वाघेरे) या प्रशिक्षिनार्थ्यानी सहभाग नोंदविला . समारोप समारंभात भारत सरकारच्या सूचना व प्रसारण मंत्रालयाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी सदाशिव मलखेडकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव भास्करराव गुंजाळ,घोटी पोलीस स्टेशनचे पी आय विनोद पाटील,पुंजा बाबा गोवर्धने कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर रकिबे,ग्रामपंचायत अधिकारी सुजित कुमार सोनवणे,विस्तार अधिकारी किरण रहाडे,पंचायत समितीचे मा सभापती सोमनाथ जोशी,सभापती,पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण, शाहीर बाळासाहेब भगत, भगीरथ मराडे कळसुबाई प्रतिष्ठान, शाहीर राजेंद्र बावनकुळे नागपूर , दत्तराज जोशी नागपूर आकाश दिवटे हे उपस्थित होते.
