
ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- नवनाथ गायकर यांजकडुन
महाराष्ट्रारात महानगर पालिका व नगर पालिका निवडणुकाचीं धुळवड सुरु आहे. शहरी कारभार्यापाठोपाठ गाव खेडयातील कारभार्याच्यांही निवडणुका होतील म्हणुन प्रशासनाने घोषित केलेल्या आरक्षणनुरुप इच्छुक उमेदवारानीं प्रचारास प्रारंभ ही केला आहे. दरम्यान न्यायालयाने यात हस्तक्षेप करत आरक्षणाची कमाल मर्यादा न ओलांडण्याची ताकिद शासन व प्रशासनाला दिल्याने या निकालाचे सावट होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकावर पडणार असुन, सातत्याने लांबणार्या या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान यामुळे मात्र इच्छुक उमेदवाराचां सातत्याने पोपट होत असल्याची खमंग चर्चा रंगत आहे.
जि.प.,पं.स. कारभार्याच्यां मुदती संपुन वर्ष दिड वर्षाचा कालावधी उलटला आहे.सर्व सत्तेची सुत्रे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यादांच एवढा प्रदिर्घ काळ प्रशासनाचे हाती असल्याने कारभार ठप्प पडल्याचे वास्तव चित्र आहे.
प्रशासनाला धोरणात्मक निर्णय घेण्याचे आधिकार आहेत. मात्र त्यांचे कातडीबचाऊ धोरण विकास प्रक्रियेला मारक ठरत आहे.
याशिवाय कारभारी नसल्याने ठराविक लोकपेरतिनिधीचेंच मर्जीने व आशिर्वादाने बिनबोभाट कामे सुरु असुन कारभार ही काहीसा अपारदर्शक बनल्याची तक्रार राजकिय नेते, कार्यकर्ते व जागरुक प्रतिनिधी करत आबे.
वचक नाहिसा झाल्याने प्रशासनाचा कारभार मनमर्जीचा व बेताल सुरु असल्याच्याही गावोगावी वाढत्या तक्रारी आहेत.
दरम्यान आरक्षणाच्या मुद्दयावरुन दिर्घकाळ स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका सतत लांबणीवर पडत आहे.
शासन, प्रशासन एक भुमिका घेत आहेत, तर जातनिहाय संघटना अनुकुल, प्रतिकुल निर्णयावर त्या त्या पद्धतीने प्रतिक्रिया व्यक्त सामाजिक दबाव व आंदोलनाची निर्मिती करत आहेत.तर तिसरीकडे संविधानाचे चौकटीत न्यायालय आपला बडगा उगारत आहे.
या सगळयामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका वादाचे भोवर्यात अडकल्या आहेत.
यामुळे आरक्षणानुरुप निवडणुक तयारी करणाराचां पुन्हा एकदा पोपट झाला आहे.
हिरमोड झालेल्या या उमेदवारानीं पुर्वतयारी जय्यत केलेली होती.ती पुन्हा एकदा पाण्यात जाते कि काय ? या भितीने इच्छुक चिंताक्रांत झालेले आहेत.
प्रशासकिय राज चा जनतेला फटका- पांडुरंग खातळे
प्रशासनावर स्थानिक लोकप्रतिनिधी यांचा वचक दुर झाल्याने कापभारात शिथिलता आली आहे.
याचा मोठा फटका तळातील जनतेला बसतो आहे.
— पांडुरंग खातळे, (माजी सरपंच कर्होळे)
….हा काय तमाशा ?- जगन्नाथ पोटकुले
सत्तेचे विकेंद्रीकरण करणेचे हेतुने पंचायत राजचा पाया घातला गेला आहे.पण या अक्षम्य दिरंगाईचा फटका तळातील जनतेस बसतो आहे.
— जगन्नाथ पोटकुले, माजी सरपंच म्हसुर्ली
