
नाशिक :(प्रतिनिधी ) वंदे मातरम् गीताच्या १५० व्या वर्धापनदिनानिमित्त डॉ. योगेश जोशी लिखित ‘वंद्य वंदे मातरम्’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सदर ग्रंथाचे प्रकाशन बल्लाळ पब्लिकेशन व अक्षरमंच पब्लिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
सदर कार्यक्रम भारतीय जनता पक्ष सांस्कृतिक आघाडीचे अध्यक्ष मा. श्री. अविनाश बल्लाळ यांच्या आयोजनाखाली संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुप्रसिध्द अर्थतज्ञ व लेखक प्रा डॉ विनायक गोविलकर सर होते तर अध्यक्ष स्थानी भाजप शहराध्यक्ष सुनील केदार उपस्थित होते. देशभक्तीपर वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात वंदे मातरम् या अजरामर गीताच्या ऐतिहासिक महत्त्वावर प्रकाश टाकण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुहास टिपरे यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. तर कु. सेजल राणे यांनी सादर केलेल्या वंदे मातरम् या गीताने उपस्थितांच्या हृदयाला स्पर्श केला व संपूर्ण सभागृह देशभक्तीच्या भावनेने भारून गेले. यावेळी मान्यवर उपस्थितीत लेखक डॉ. योगेश जोशी यांचा सत्कार करण्यात आला व त्यांच्या लेखन कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले.
या कार्यक्रमास भाजप शहर सरचिटणीस श्याम बडोदे, सोनाली कुलकर्णी, देवानंद बीरारी, माजी नगरसेवक सुनील खोडे, सुधाकर गायधनी, डॉक्टर केंगे, विराज लोमटे, आशा बल्लाळ, अंजली नारायण, रवी पाटील, अतुल देशपांडे, सिद्धेश सोमवंशी, नीलेश अभ्यंकर, तसेच अनेक ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सौ श्रद्धा भुरे यांनी आभार प्रदर्शन केले…
