
नाशिक ( प्रतिनिधी )दि एज्युकेशन इन्स्टिट्यूट,नाशिक संचलित यशोदामाता डायाभाई बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,नाशिक या शाळेत आज बुधवार दि.२६/११/२०२५ रोजी २६,नोव्हेंबर संविधान दिन साजरा करण्यात आला.यावेळी शाळेचे उपमुख्याध्यापक मा.श्री राजेंद्र सोमवंशी सर व ज्युनिअर कॉलेजचे उपमुख्याध्यापक मा.श्री मिलिंद कोठावदे सर यांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस व भारताचे संविधानास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

ज्युनिअर कॉलेजचे उपमुख्याध्यापक मा.श्री मिलिंद कोठावदे सर यांनी अध्यक्षीय मनोगतातून संविधान निर्मितीचे महत्त्व सांगून शालेय ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत भारतीय संविधान चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकविले गेले पाहिजे,जेणेकरून शिक्षण पूर्ण होऊन प्रत्येक विद्यार्थी हा संविधानाला अभिप्रेत असलेला असा भारताचा एक सुशिक्षित आणि जबाबदार नागरिक बनून बाहेर पडेल.

अशा नागरिकांकडून कधीही देशाला नुकसान पोचेल अस काम होणार नाही,असे सांगत संविधानाने दिलेल्या मूल्यांचा सर्वांनी आदर करावा.श्री महेंद्र जगताप सर यांनी प्रास्ताविकातून भारताचे संविधान दिनाचे महत्त्व सांगितले.तसेच कु.मंजूश्री बच्छाव ११-क,कु.महेक शेलार ११-क,कु.स्नेहा निकम ११-क व कु.ज्ञानेश्वरी पवार इ.१२वी क या विद्यार्थिनींनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची व संविधान दिनाची अभ्यासपूर्ण माहिती सांगितली.इ.८वीच्या विद्यार्थिनींनी संविधान दिनानिमित्त सुंदर असा संविधान पोवाडे सादर केले.सुत्रसंचालन श्री चंदर बोरसे सर यांनी तर आभारप्रदर्शन श्री पंकज अहिरे सर यांनी केले.फलकलेखन सौ.सायली मुळे मॅडम यांनी केले.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री प्रकाश वैशंपायन साहेब,उपाध्यक्ष मा.श्री प्रभाकर कुलकर्णी साहेब,सेक्रेटरी मा.श्री हेमंत बरकले सर,शालेय समिती चेअरमन मा.श्री रमेश महाशब्दे साहेब,यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.सविता कुशारे मॅडम,अधिक्षिका मा.सौ.मीना वाळूंजे मॅडम,उपमुख्याध्यापक मा.श्री राजेंद्र सोमवंशी सर व ज्युनिअर कॉलेजचे उपमुख्याध्यापक मा.श्री मिलिंद कोठावदे सर,पर्यवेक्षिका सौ.सुषमा गवारे मॅडम,गव्हर्निंग कौन्सिल सदस्य श्री कैलास बागुल सर,सौ.भारती चंद्रात्रे मॅडम,सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनींनी उपस्थित होते.
