
सिन्नर प्रतिनिधी:- डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात’ संविधान दिन ‘ उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक रंगनाथ उगले होते. व्यासपीठावर पर्यवेक्षिका जयश्री पगारे, जेष्ठ शिक्षक मारुती डगळे ,सोमनाथ गिरी,सुनिल ससाणे, रामदास वारुंगसे,रेखा खंडीझोड आदी उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते संविधानाचे ग्रंथाचे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले होते .

संविधानाची निर्मिती ,संविधानातील विविध कलमे ,मुलभूत हक्क, संविधानाचे महत्त्व, संविधान दिन का साजरा करतात याविषयी मुख्याध्यापक रंगनाथ उगले ,पर्यवेक्षिका पगारे यांनी सविस्तर माहिती दिली. उपशिक्षिका जयश्री गोहाड यांनी विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी संविधान प्रतिज्ञा दिली .हरेश वाजे,वेदांत वारुंगसे,ऋतुजा कडभाने या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी गाडेकर हिने केले तर आभार अक्षदा जगधने हीने मानले .यावेळी कार्यक्रमास विद्यालयातील डी. ए.रबडे,रेवणनाथ कांगणे, किशोर शिंदे,ज्ञानेश्वर कडभाने,अरुण जारस,संकेत जाधव आदींसह शिक्षक ,शिक्षकेत्तर सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.
