
सिन्नर (प्रतिनिधी ) २६ नोव्हेंबर २०२५ भारतीय संविधान दिन व २६/११च्या मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहिद झालेल्या पोलिस वीर जवान नागरिकांना अभिवादन! महामिञ परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने सिन्नर येथे करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात संविधानाच्या व डाँ.बाबासाहेब आंबेडकर तसेच जयपाल मुंडा प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे म्हणाले की
भारताच्या संविधानामुळेच भारताची लोकशाही टिकुन आहे.भारताची एकता व एकात्मता,एक सार्वभौम,समाजवादी,धर्मनिरक्षेप लोकशाही,मागास वर्गातील बहुजन समाजाच्या सामाजिक,शैक्षणिक,राजकिय आरक्षणाची तरतुद संविधानामध्ये असल्यामुळेच आज विविध क्षेञामध्ये मागासवर्गीय नोकरीला पदावरती कार्यरत आहेत.डाँ.बाबासाहेब आंबेडकर,जयपाल मुंडा आणि सहका-यांनी दि.२६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान अंगिक्रुत व अधिनियमीत करून राष्ट्रास अर्पण केले.संविधानाने जे आपल्याला हक्क अधिकार दिले आहेत त्याची अंमलबजावणी सर्व सरकारने केली पाहिजे व जनतेने आपल्या हक्क अधिकारासाठी लढलं पाहिजे.यावेळी संविधानाची उद्देशिका वाचण्यात आली.
तसेच २६/११/२००८ साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहिद झालेल्या पोलिस वीर जवान व नागरिकांना आदरांजली वाहुन अभिवादन! करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सुञसंचलन किरण मुठे यांनी केले.व प्रास्ताविक विजय मुठे यांनी केले.तर आभार रुपेश मुठे यांनी मानले
यावेळी महामित्र दत्ता वायचळे राघोजी ब्रिगेडचे सहसंस्थापक विजय मुठे,मा.नगरसेवक रूपेशभाऊ मुठे, किरण मुठे,अनिल काळे,बाळासाहेब जाधव, जगन्नाथ वरंदळ, आकाश धोंगडे संदिप मुठे,सतिश बिन्नर, दिलीप सदगीर ओम जगताप, सार्थक सांगळे, सिताराम नरोडे,सजीव कडू,सम्राट तरकसे,गोरख धावणे,शाम डांगे उपस्थित होते.
