
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१०१ वा दिवस
मानसिक दृष्टीने पाहिले असता हे विश्व म्हणजे महान विचारसमुद्र आहे आणि त्यात तुम्ही व मी असेच विचारांचे लहान लहान भोवरे आहोत. आत्म्याच्या दृष्टीने पाहिल्यास सर्व विश्व म्हणजे अचल अविकारी अशी सत्ता आहे हे विश्व म्हणजे अविकारी, अखंड, एकरस, एकमेवाद्वितीय असा आत्माच आहे. जगाच्या नीतीविषयक अपेक्षा मोठ्या प्रमाणात ऐकू येत आहेत. आपल्या ग्रंथांच्या सहाय्याने त्या पूर्ण करता येतील. नीतीचे स्पष्टीकरण, नीतीचा पाया आज जगाला हवा आहे. आणि तो आपल्या ग्रंथात प्राप्त होऊ शकेल.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर ५ अग्रहायण शके १९४७
★ मार्गशीर्ष शुध्द /शुक्ल ६
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ बुधवार दि. २६ नोव्हेंबर २०२५
★ चंपाषष्ठी, मार्तंड भैरवोत्थापन
★ मल्हारी मार्तंड नवरात्र समाप्ती
★ १९२१ भारतीय दुग्धोत्पादनातील ‘धवल क्रांतीचे’ जनक, ‘अमूलचे’ संस्थापक, राष्ट्रीय दुग्धोद्योग महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष व्हर्गिस कुरियन यांचा जन्मदिन.
★ १९४९ भारतीय संविधान दिन.
★ २००८ मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला
★ शहिद जवान स्मृतीदिन.
