
धर्मास येते ग्लानी जेव्हा,
अवरतो कुणी तरी महापुरुष
फडकवतो धर्म पताका आसमंती,
धर्मरक्षक महापुरुष…
हिंदु सनातन लढले आणि,
शांत संयमी शतकानुशतके
आज अयोध्या सजली नटली, प्रभु दिमाखे विराजे…
नमन धर्म पताका सरसर,
भगवी आमची शान डोलली
धन्य धन्य आम्ही जाहलो,
पाहिले प्रभुस अयोध्या मंदिरी…
कवीवर्य धर्मसेवक
नवनाथ अर्जुन पाटिल गायकर
