
ओझर: दि.२५ वार्ताहर महाराष्ट्राचे अखंड कुलदैवत श्री खंडेराव महाराज यात्रेनिमित्त ओझर येथील माधवराव बोरस्ते विद्यालयात प्रति जेजुरी पाचोरे वणी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य श्री गवारे महाराज यांच्या हस्ते खंडेराव महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी स्कूल कमिटी सदस्य निवृती शेटे लक्ष्मण चौधरी वसंत गवळी अरुण गवळी सोमनाथ चव्हाण अक्षय गोसावी सिद्धार्थ निकम सचिन लोकरे बापू पगार आदी ग्रामस्थ उपस्थित होते. शिवनाई येथील शिव मल्हार जागरण गोंधळ पार्टीचे रवींद्र चव्हाण दिलीप चव्हाण एकनाथ जाधव शंकर वायकंडे कृष्णा जाधव सचिन गांगोडे म्हाळसा बानुच्या भूमिकेतील माळसाकिंग अमोल गोडसे भाऊसाहेब गोधडे आदी वाघे मंडळींनी गोंधळ गीते सादर करीत कार्यक्रमाची शोभा वाढवली. सदर भंडारा कार्यक्रमाच्या पूजेसाठी संजय शेजवळ मेघा शेजवळ, संजय पगार सौ पगार, विकास संगमनेरे सौ संगमनेरे, प्रभाकर लवांड सविता लवांड, महेंद्र डांगळे मोनाली डांगळे या सर्व सेवकांच्या हस्ते पूजा आरती करण्यात आली. मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे आत्माराम शिंदे बाबासाहेब गायकवाड नरेंद्र डेरले मंगल सावंत संगीता शेटे सरोज खालकर शितल आहेर सर्व सेवक व शिक्षकेतर सेवक उपस्थित होते. फलक रेखाटन कलाशिक्षिका सविता पवार मोनाली निकम यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षिका शितल हांडोरे यांनी केले.आभार उपमुख्याध्यापक सतीश केदार यांनी मानले.
