
सिन्नर प्रतिनिधी( सोमनाथ गिरी) :- मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने मविप्र संस्था कर्मवीर चषक कबड्डी स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त केले. १७ वर्षाआतील मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला असून या संघाची जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे . स्पर्धेत ईश्वर पडवळ, पियुष पडवळ, प्रमोद वाजे ,आदेश वाजे , हर्षद वाजे, सार्थक ढोली, आयुष माळी, राहुल गोफणे, सार्थक वारुंगसे,सार्थक कडभाने या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
तसेच १७ वर्षाआतील मुलींच्या गटाने तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धेत खुशी वाघ ,अक्षदा सांगळे, शितल वारुंगसे, सायली आव्हाड, स्वाती माळी, अर्चना वाजे, प्रगती वाजे, वैष्णवी जगधने ,प्रणाली गुरव या विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक शिवाजी गुरुळे व जयश्री गोहाड यांचे मार्गदर्शन लाभले .यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचा सत्कार ज्येष्ठ नेते प्रकाश भाऊ वाजे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक रंगनाथ उगले, पर्यवेक्षिका जयश्री पगारे,मारुती डगळे , रामदास वारुंगसे आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन सोमनाथ गिरी यांनी केले तर आभार सुनिल ससाणे यांनी मानले. विद्यार्थ्यांचे कौतुक मविप्र संस्थेचे सरचिटणीस अॅड नितीन ठाकरे, संचालक कृष्णाजी भगत ,शालेय समितीचे अध्यक्ष नारायण वाजे, उच्च माध्यमिक समितीचे अध्यक्ष विठ्ठल तात्या वामने, सरपंच रामनाथ पावसे आदींसह शालेय समिती सदस्य, शिक्षक- पालक संघ ,शिक्षक ,शिक्षकेतर सेवक केले आहे.
