
मविप्र संचलित न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करताना मुख्याध्यापिका ज्योती काळे, उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे व शिक्षक वृंद
नांदगाव —- मविप्र संचलित न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापिका ज्योती काळे, उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे व उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.

मुख्याध्यापिका ज्योती काळे यांनी आपल्या मनोगतातून यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याची ओळख करून देताना यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यांनी कायदा व सुव्यवस्था ऐवजी विकासभिमुख प्रशासनावर भर दिली. सामान्य माणूस हा त्यांच्या राजकीय आणि आर्थिक धोरणाचा केंद्रबिंदू होता. त्यांनी भारताचे पहिले उपपंतप्रधान पद १९७९ मध्ये भूषविले. १९६२ मध्ये चीन युद्धानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांची केंद्रीय संरक्षण मंत्री पदी नियुक्ती केली, तेव्हा ”हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला” असे ऐतिहासिक विधान त्यांनी केले.
त्यांची ‘कृष्णाकाठ’, ‘ऋणानुबंध’, ‘युगांतर’ आणि ‘सह्याद्रीचे वारे’ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.
थोडक्यात,यशवंतराव चव्हाण यांचे कार्य महाराष्ट्राचा राजकीय ,सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत मूलभूत आधारस्तंभ ठरले आहे.
याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद आहेर यांनी केले.
