
नांदगाव ( प्रतिनिधी)- ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्था टाकळीभान तालुका श्रीरामपूर यांचे वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय उत्कृष्ट मराठी अध्यापक कार्य गौरव पुरस्कार न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक या शाळेतील उपशिक्षक पदावर कार्यरत असणारे, मराठी विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक सुपेकर सुनील रावसाहेब यांना प्रदान करण्यात आला. रविवार दिनांक २३ मार्च २०२५ रोजी ज्ञानज्योती बहुउद्देशिय संस्था यांच्याकडून राज्यस्तरीय तिसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन रूक्मिणी माधव मंगल कार्यालय टाकळीभान या ठिकाणी करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध भाषातज्ज्ञ आणि समीक्षक प्राध्यापक डॉक्टर केशव देशमुख हे होते तर कुसुमाग्रज यांच्या मानसकन्या रेखाताई भांडारे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला . .शिक्षण क्षेत्रातील मराठी भाषेची सेवा केलेल्या राज्यभरातील मान्यवरांचा सदर प्रसंगी गौरव करण्यात आला . या कार्यक्रमाला ज्येष्ठ कवी पोपटराव पटारे, आमदार हेमंत ओगले , सभापती वंदनाताई मुरकुटे , प्राध्यापक डॉक्टर बापूराव उपाध्ये , प्राध्यापक डॉक्टर संदीपराव सांगळे व ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्री. अर्जुन राऊत उपस्थित होते . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. बापूसाहेब तनपुरे व सौ. सुरेखा घोलप यांनी केले .तसेच नांदगाव तालुका संचालक इंजि.मा.श्री.अमितभाऊ बोरसे पाटील, स्कूल कमिटी अध्यक्ष श्री .काकळीज सर, मुख्याध्यापिका श्रीम.काळे जे.आर, उपमुख्याध्यापक श्री थेटे एस. जी, सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेछा दिल्या.

